Water problem Dainik Gomantak
गोवा

पिसुर्लेत तीव्र पाणीटंचाई

टँकरवर भिस्त: न्यायालयीन आदेशानुसार पाहणी

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले: पिसुर्ले पंचायतक्षेत्रात खाण व्यवसायामुळे नैसर्गिक जलस्त्रोतावर परिणाम झाल्याने लोकांना पाण्यासाठी टॅंकरवर अवलंबून राहावे लागते, यामुळे या भागात तीव्र पाणीटंचाई उद्‍भवली होती. या पार्श्‍वभूमीवर पिसुर्ले येथील हनुमंत परब यांनी गोवा खंडपीठात दाखल केलेल्या जनहित याचिकेची दखल न्यायालयाने घेतली. न्यायालयीन आदेशानुसार आज सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी पुरवठा विभागाने पिसुर्ले पंचायत क्षेत्रातील विविध वाड्यावर भेटी देऊन सविस्तर पाहणी केली.

पिसुर्ले पंचायत क्षेत्रातील विविध वाड्यांवर सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. या वेळी लोकांनी या अधिकाऱ्यांना पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याचे दाखवून दिले. काही घरे उंच भागात असल्याने जलवाहिनीद्वारे होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याने ते उंच भागात चढत नसल्याचे दाखवून दिले.

त्याचप्रमाणे टॅंकरद्वारे पुरवले जाणारे पाणी पुरेसे नसल्याने समस्या निर्माण उद्‍भवत असल्याचे ग्रामस्थांनी पाणीपुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी केलेल्या पाहणीत धाटवाडा तसेच धोणकल वाडा येथील सरकारी प्राथमिक शाळेला सुध्दा पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने शाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचे आढळून आले आहे. या वेळी डिचोली पाणी पुरवठा खात्याचे वरिष्ठ अभियंते तिवरेकर, वाळपई पाणी पुरवठा खात्याचे सहाय्यक अभियंते सोमा नाईक, तांत्रिक अधिकारी रोहिदास नाईक, कनिष्ठ अभियंते योगेश सावंत, याचिकादार हनुमंत परब, व इतर नागरिक उपस्थित होते.

वाघुरेत जलशुध्दी प्रकल्प व्हावा !

पिसुर्ले भागातील पाणीटंचाईचा विषय संपुष्टात आणण्यासाठी वाघुरे येथील बंद पडलेल्या खाण कंपनीच्या पिटात (खंदकात) साठून राहिलेल्या लाखो लिटर पाण्यावर जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन सदर प्रकल्प त्वरित मार्गी लावावा,अशी मागणी या वेळी येथील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभाग अधिकाऱ्यांकडे केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT