Fire  Dainik Gomantak
गोवा

Fire In Parra: पर्रा- आसगाव जंगलात भीषण आग, अग्निशमन दलाचे 3 टँकर घटनास्थळी दाखल

उन्हात भडकलेली ही आग नियंत्रणात आणताना अग्निशमन दलाच्या जवानांना कसरत करावी लागतेय

गोमन्तक डिजिटल टीम

Fire In Parra गोव्यात आगीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून मागील तीन-चार दिवसात सुमारे 15 ते 20 ठिकाणी आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत. दुकाने, फॅक्टरी यांच्या सोबतच जंगल, आंबा-काजू बागा यांसह मोकळ्या माळरानावर वणवे लागण्याच्या घटना घडत आहेत.

म्हापशा शेजारील पर्रा- आसगाव दरम्यानच्या जंगलात भीषण आग लागल्याचे वृत्त हाती आले आहे. ही आग सकाळी आठच्या सुमारास लागल्याची माहिती मिळाली आहे. ही आग विझवण्यासाठी आत्तापर्यंत अग्निशमन दलाचे 3 टँकर घटनास्थळी दाखल झाले असले तरी अद्याप आगीवर नियंत्रण मिळवता आलं नाहीय.

Fire

दरम्यान दुपारी रखरखत्या उन्हात भडकलेली ही आग नियंत्रणात आणताना अग्निशमन दलाच्या जवानांना कसरत करावी लागतेय. काल सायंकाळी अचानक आयआयटी डोंगरावर आग लागल्याची घटना घडली होती. या आधी सांगे भागात एकाच दिवशी चार ठिकाणी आग लागून मालमत्तेची हानी झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

तसेच काल कारापूर येथील लोकवस्तीजवळ माळरानाला आग लागण्याची घटना घडली असून या आगीत काजू बागायती जळून खाक झाल्याने येथील काजू बागायतदारांचे लाखोंचे नुकसान झाले. एकंदरीत बागायतींमधील या वाढत्या आगींमुळे बागायतदार चिंतेत असून या मागे काही षडयंत्र तर नाही ना अशा चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT