आपेव्हाळ-प्रियोळ येथे कदंब बसला अपघात  Dainik Gomantak
गोवा

Goa: आपेव्हाळ-प्रियोळ येथे कदंब बसला अपघात

चार जखमी, दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बसला झाला अपघात

दैनिक गोमन्तक

फोंडा: फोंड्याहून (Ponda) वळवईला निघालेल्या कदंब (Kadamba Bus) बसगाडीला आपेव्हाळ - प्रियोळ येथे अपघात (Accident) होऊन चौघेजण जखमी झाले. यातील एका जखमीला पुढील उपचारासाठी बांबोळी इस्पितळात दाखल करण्यात आले असून तिघांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. हा अपघात आज (सोमवारी) सकाळी पावणे आठच्या दरम्यान घडला. (Several passengers left injured after Kadamba bus travelling in Ponda Savoi Verem route goes off road at Apewal)

फोंड्याहून वळवईला जाताना कदंबच्या या बसगाडीत फक्त सहाच प्रवासी होते. आपेव्हाळ येथे पोचल्यावर अचानकपणे आडव्या आलेल्या गुरांमुळे वाहनचालकाचे नियंत्रण गेल्याने बसगाडी रस्त्याच्या बाहेर गेली व कुंपणाला धडकून पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी बांधलेल्या गटारात एका बाजूने कलंडली. अपघातात वीज खांबाला बसची धडक बसल्याने दर्शनी भागाची मोठी हानी झाली.

या अपघातात धनश्री नाईक (वय ३०) आडपई - दुर्भाट, मेघन सावंत (वय ५२) केपे तसेच बसवाहक सुषमा गावडे (वय ४२) तामसुली - खांडोळा व चालक प्रकाश साळुंके (वय ३२) जखमी झाले. त्यातील धनश्री नाईक हिला जबर मार बसल्याने तिला बांबोळी इस्पितळात दाखल करण्यात आले असून उर्वरित तिघांना घरी पाठवण्यात आले.

दरम्यान, फोंडा - दुर्भाट मार्गावर कपिलेश्‍वरी - कवळे येथे काल मध्यरात्री रस्त्यावर बसलेल्या गाईला धडकून दुचाकीला अपघात झाला. या अपघातात गाय जागीच गतप्राण झाली तर दोघेही दुचाकीस्वार जखमी झाले. दोन्ही अपघातप्रकरणी फोंडा पोलिसांनी पंचनामा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT