Ganesh Utsav Dainik Gomantak
गोवा

Goa Salcete: 'घोगळ' सिद्धिविनायक मंदिरात सात दिवसांचा गणेशोत्‍सव

Salcete: आयोजन समितीच्या अध्यक्षपदी अविनाश शिरोडकर यांची एकमताने निवड करण्यात आली

दैनिक गोमन्तक

Salcete: हाऊसिंग बोर्ड-घोगळ येथील श्री सिद्धिविनायक मंदिराची बैठक होऊन सार्वजनिक गणपती उत्सवाची रुपरेषा ठरविण्यात आली. सात दिवसीय उत्सव यशस्वी करण्यासाठी आयोजन समिती व इतर उपसमित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयोजन समितीच्या अध्यक्षपदी अविनाश शिरोडकर यांची एकमताने निवड करण्यात आली. मंदिराचे अध्यक्ष रमेश देसाई यानी त्यांचे नाव सुचविले व सर्वांनी त्यास संमती दिली. त्यानंतर विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आली.

दररोज श्री गणरायाच्‍या मूर्तीची विधिवत पूजा, दुपारी व रात्री आरती, तीर्थप्रसाद होणार आहे. इतर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत. पहिल्या दिवशी गणेश स्थापना व संध्याकाळी भजनसंध्या. दुसऱ्या दिवशी गणेशपूजा व संध्याकाळी भजनसंध्या.

तिसऱ्या दिवशी संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम, काराओके गायन कार्यक्रम. चौथ्या दिवशी संध्याकाळी ओम साई मेलोडिज ऑर्केस्ट्रा, पाचव्या दिवशी भजनसंध्या, सहाव्या दिवशी दहावी, बारावी, पदवीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व नाटक तर सातव्या दिवशी पावणी झाल्‍यावर विसर्जन मिरवणूक निघणार आहे.

स्थापना व विसर्जन समिती : सत्येन गावकर, पुष्पचंद्र कवळेकर, सचिन पै, योगेश वागळे, अजय शिगावकर, पांडुरंग आर. नाईक, सुधाकर नाईक, सुदिन गावकर, संजीव गावकर, वरद धुरी, वेदाक्ष व्ही. रायकर, मारुती कामत, शुभम नाईक, रोहन मयेकर. सजावट व प्रकाशयोजना : संदीप मडकईकर, मयूर देसाई, पुष्पचंद्र कवळेकर, वरद धुरी, सनी रासईकर, प्रसाद गायतोंडे, योगेश वागळे, सचिन पै.

आर्थिक समिती : रमेश देसाई, सदानंद नाईक, डॉ. देश प्रभुदेसाई, अविनाश शिरोडकर, महेंद्र नाईक, पांडुरंग नाईक देसाई, पांडुरंग आर. नाईक, सोमनाथ आमोणकर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT