Benaulim Boats and Nets Fire  Dainik Gomantak
गोवा

Benaulim: बाणावलीत मच्छीमारी बोटींना आग लावण्याप्रकरणी एकास अटक

बोटमालकांचे 10 ते 12 लाख रुपयांचे नुकसान झाले होते

गोमन्तक डिजिटल टीम

Benaulim Boats and Nets Fire: बाणावलीत बोटींना व मासेमारी जाळींना आग लावल्याप्रकरणी कोलवा पोलिसांनी रोफिलियो फेर्नांडीस या युवकाला अटक केली आहे.

तो वाडी बाणावली येथील रहिवाशी आहे. या प्रकरणातील अन्य एक आरोपी फरारी असून पोलीस त्याच्या शोधात आहे.

(Setting ablaze fishing boats and nets at Benaulim)

वाडी बाणावली येथील समुद्र किनाऱ्यावर नांगरून ठेवलेल्या दोन बोटींना 26 फेब्रुवारी रोजी पहाटे अडीचच्या सुमारास आग लावण्याचा प्रकार घडला होता.

यावेळी बोटमालकांचे 10 ते 12 लाख रुपयांचे नुकसान झाले होते आणि या विषयी त्यानीं अज्ञात व्यक्ती विरुद्ध कोलवा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व वैमनस्यातून हा आग लावण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी स्थानिक आमदार वेन्झी व्हिएगस यांनीही लक्ष घातले होते व याप्रकरणी तपास करण्याची मागणी केली होती.

सासष्टीचे उपअधीक्षक संतोष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक थेरन डिसोजा आणि उपनिरिक्षक सुभाष गावकर यांनी इतर पोलीसांच्या मदतीने त्या तपास करून वरील संशयित आरोपीला अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: पंतप्रधान मोदींनी दिल्या गोवा मुक्तीदिनाच्या शुभेच्छा

Goa ZP Election: भाजप-मगोसमोर भाटीकरांचे आव्हान? कुर्टी झेडपीसाठी ‘आप’सह काँग्रेसही रिंगणात; फोंडा पोटनिवडणुकीवर डोळा

Goa Politics: खरी कुजबुज; रवी पुत्रांचा अप्रत्यक्ष इशारा!

'मृतांमध्ये आमच्या 20 कर्मचाऱ्यांचा जीव गेला याचे दुःख'! लुथरा बंधूंनी पोलिसांसमोर मांडली बाजू; महिन्याला 25 लाख हफ्ता देत असल्याची चर्चा

Cabo De Rama Khol: ‘खोल’ टेकडीचा 2012 पासून खुलेआम विध्वंस! प्रशासन गांधारीच्‍या भूमिकेत; CRZ प्राधिकरणाच्‍या प्रकार लक्षात आणूनही दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT