Goa Assembly Dainik Gomantak
गोवा

आजपासून गोव्यात आठव्या विधानसभेचे अधिवेशन

सभापतींची निवड आणि लेखानुदानाला घेणार मान्यता

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा राज्याचे आठव्या विधानसभेचे अधिवेशन मंगळवार, (ता.29) व बुधवार (ता.30) रोजी प्रश्‍नोत्तराच्या तासाविनाच होणार आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभापती आणि उपसभापतीपदाची निवडणूक जाहीर होणार आहे. यानंतर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांचे अभिभाषण होईल. 30 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. मात्र, त्यावर पावसाळी अधिवेशनात चर्चा होऊन तेव्हा मंजूर केला जाणार आहे. तोपर्यंत लेखा अनुदान ठराव मांडला जाणार आहे.

गोवा विधीमंडळ सचिव नम्रता उल्मन यांनी दिलेल्या माहितीनुसार, विधिमंडळ कामकाज नियम 306 नुसार कामकाज नियम शिथिल केला जाणार आहे. त्यासाठी या विधानसभा अधिवेशनात केवळ सरकारी कामकाज केले जाईल अन्य कोणतेही कामकाज केले जाणार नाही असा ठराव मंजूर करावा लागणार आहे. हा ठराव सत्ताधारी गट मांडणार आहे. 29 रोजी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहू शकणाऱ्या आमदारांच्या नावाची निश्चिती केली जाणार आहे. यावेळी अभिनंदनपर प्रस्ताव व शोक प्रस्ताव विधानसभेत सादर केला जाईल. राज्यपालांनी मान्यता दिलेल्या विधेयकांबाबत विधानसभेला विधीमंडळ सचिव माहिती देणार आहेत. वित्तमंत्री 2022-23 आर्थिक वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. त्यानंतर लेखानुदान मागणी करणारा ठराव मांडला जाईल तसेच संबंधित वित्त विनियोग विधेयक मांडले जाणार आहे. विधानसभेत दुसऱ्या दिवशी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या सदस्यांची निवड केली जाणार आहे.

सभापतीपदी तवडकर यांची निवड निश्‍चित

मंगळवारी विधानसभेचे कामकाज सभापतीपदासाठीची निवडणूक होणार आहे. यावेळी हंगामी सभापती गणेश गावकर हे कामकाज हाताळणार आहेत. भाजपतर्फे आमदार रमेश तवडकर तर विरोधकांतर्फे काँग्रेसचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांनी या पदासाठी अर्ज दाखल केले आहेत. भाजप सरकारकडे बहुमत असल्याने तवडकर यांची निवड निश्‍चित आहे. या अधिवेशनात प्रश्‍नोत्तराचा तास, लक्ष्यवेळी सूचना, शून्य तास, खासगी ठराव व अर्ध्या तासाची चर्चा, हरकतींचा मुद्दा आदी विधीमंडळ कामकाजाचा वापर आमदारांना करता येणार नाही.

अर्थसंकल्पाची पूर्वतयारी

मुख्यमंत्रिपदाची आज शपथ घेतली असली तरी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्राथमिक तयारी यापूर्वीच केली आहे. राज्याच्या विविध खात्यांच्या मागण्या काय आहेत, त्यांना कोणत्या कामासाठी किती निधीची गरज आहे याचा अंदाज वित्त खात्याकडून घेण्यात आला आहे. अर्थसंकल्पाचा ढोबळ आराखडा तयार करण्यात आला आहे. वित्तमंत्री सोमवारी 29 रोजी सायंकाळी आणि मंगळवारी त्याला अंतिम रुप देतील अशी माहिती वित्त खात्यातून मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मोदी विरोधकांना घाबरवतात म्हणून मी तसे म्हणालो", मल्लिकार्जुन खर्गेंचं 'त्या' जहरी टीकेवर स्पष्टीकरण; भाजपकडून माफीची मागणी कायम VIDEO

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

SCROLL FOR NEXT