Comunidade Land Dainik Gomantak
गोवा

Goa Comunidade: सेरूला कोमुनिदाद जमिनीवरील घरे नियमित करण्याची मागणी

Goa Comunidade: मुख्यमंत्र्यांना निवेदन : कायदा दुरुस्तीचा मार्ग अवलंबणार

दैनिक गोमन्तक

Goa Comunidade: आगोंद कोमुनिदादच्या जमिनीवरील घरे नियमित करण्यासाठी कायदा दुरुस्तीचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यापासून कोमुनिदाद जमिनीवरील घरे नियमित करण्याची मागणी घेऊन अनेकजणांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भेटणे सुरू केले आहे.

सेरूला कोमुनिदादच्या जमिनीवर बांधण्यात आलेली घरे नियमित करण्यासाठी कायदा दुरुस्ती त्वरित करा, अशी मागणी तेथील रहिवाशांनी आज मुख्यमंत्री यांच्याकडे केली.

मंत्रालयाच्या द्वारापाशीच सुमारे 50 जणांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना तशा आशयाचे निवेदन दिले.

सहकार्य करावे!

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, कोणत्याही स्थितीत कोमुनिदाद जमिनीवर अतिक्रमण करून बांधलेली झोपडपट्टी नियमित करण्याचा सरकारचा विचार नाही.

गोमंतकीय जे वर्षानुवर्षे त्या जमिनीवर राहत आहेत. त्यांची घरे कधीतरी नियमित केली पाहिजेत. त्यासाठी कोमुनिदाद संस्थांनी सहकार्य करावे.

सरकारला केवळ गोमतकीयांना न्याय द्यायचा आहे हे समजून घ्यावे. भूखंड वाटप प्रक्रिया सदोष असेल तर ती कार्योत्तर दुरुस्त केली गेली पाहिजे.

यासाठी कोमुनिदाद व महसूल कायद्यात दुरुस्तीची सरकारची तयारी आहे. कोमुनिदाद संस्थांनी गोमंतकीयांचे हे प्रश्न समजून घ्यावेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT