Horse Dainik Gomantak
गोवा

Horse Died In Mapusa: अज्ञात वाहनाच्या धडकेत घोडा ठार; मालकाविरोधात तक्रार

Mapusa Goa Accident: जखमी घोड्याला प्राण्यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान, घोड्याचा मृत्यू झाला आहे.

Pramod Yadav

म्हापसा: अज्ञात वाहनाच्या धडकेत घोडा ठार झाल्याची घटना शुक्रवारी (२१ मार्च) सकाळी उघडकीस आली. या घटनेची प्राणी विरोधातील क्रूरता प्रतिबंधक जिल्हा सोसायटीने गंभीर दखल घेतली असून, घोडा मालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. घोडा मालकाने प्राण्याच्या सुरक्षेसाठी पुरेशी काळजी न घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

गिरी म्हापसा परिसरात महामार्गावर एक घोडा फिरत होता. मार्गावर तो फेऱ्या मारत असल्याने वाहनांना अडथळा ठरत होता. दरम्यान, शुक्रवारी सकाळी एका अज्ञात भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत घोडा गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. जखमी घोड्याला प्राण्यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान, घोड्याचा मृत्यू झाला आहे.

या घटनेची उत्तर गोवा प्राणी विरोधातील क्रूरता प्रतिबंधक जिल्हा सोसायटीने गंभीर दखल घेतली आहे. मालकाने घोड्याला बेवारस सोडल्याने महामार्गावर त्याचा अपघातात मृत्यू झाला. याप्रकरणी मालकाविरोधात तक्रार दाखल केल्याचे सोसायटीने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. प्राणी विरोधातील क्रूरता प्रतिबंधक कायदा नियम दोन आणि बीएनएस कायदा ३२५ अंतर्गत मालकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

घोडा मालकाने यापूर्वी देखील अशाप्रकारचे दुर्लक्ष केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबतचे फोटो आणि व्हिडिओ पुरावे उपलब्ध असून, मालकाने याबाबत वारंवार सूचित करण्यात आले होते, असेही तक्रारीत म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT