Water Problem Dainik Gomantak
गोवा

डिचोली पालिका परिसरात दोन दिवसांपासून पाण्याची गंभीर समस्या; नागरिकांचे हाल

Water Problem : भर पावसात नळांना पाणी येत नसल्याने नागरिकांचे विशेषतः गृहिणींचे पुरते हाल झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

डिचोली : डिचोली पालिका क्षेत्रातील काही भागात पुन्हा एकदा पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. भर पावसात नळांना पाणी येत नसल्याने नागरिकांचे विशेषतः गृहिणींचे पुरते हाल झाले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी सध्या मारामारी झाल्याने नागरिकांना वणवण करावी लागत आहे.

शहरातील कातरवाडा, आयडीसी, जोगीवाडा आदी काही भागात कालपासून (गुरुवारी) नळांना धड पाणी येत नसल्याने नागरिकांना विशेषत: गृहिणींना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

(Serious water problem from two days in Bicholim goa)

एकाबाजूने पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे पाण्यासाठी घराबाहेर जाणेही अवघड बनले आहे. पाणी पुरवठा खात्याने त्वरित ही समस्या दूर करावी. अशी मागणी नागरिक विशेषतः गृहिणींकडून करण्यात येत आहे. उपलब्ध माहितीनुसार वीज समस्येमुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे समजते. वीस दिवसांपूर्वीही कातरवाडा आदी भागात पाण्याची समस्या निर्माण झाली होती.

पावसाच्या पाण्याचा वापर

काही भागात विहिरी नसल्याने गृहिणींना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. जोगीवाडा येथे विहीर आहे, परंतु ती दूषित आहे. सध्या पावसाचे पाणी साठवून त्या पाण्याचा अंघोळ आणि अन्य दैनंदिन कामासाठी वापर करण्यात येत आहे. असे जोगीवाडा येथील रहिवासी संतोष डिचोलकर आदी नागरिकांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Legends T20 League Goa: शेन वॉटसन, शिखर धवन, हरभजन सिंग खेळणार गोव्यात! वर्ल्ड लीजंड्स प्रो टी-२० लीग क्रिकेटचा थरार

Tuyem Hospital: तुये इस्‍पितळात होणार 12 ‘ओपीडीं’चा समावेश! आरोलकरांची ग्‍वाही; लवकरच गोमेकॉशी होणार लिंक

Goa Tourism: गोवा हाऊसफुल! Long Weekend मुळे किनाऱ्यांवर गर्दी; विदेशी पर्यटक मात्र गायब..

Khandola: 'गावपण उद्ध्वस्त करणारा प्रकल्प नकोच'! ‘गेरा’ प्रोजेक्टविरुद्ध खांडोळावासीयांचा एल्गार; ग्रामसभेत ठराव मंजूर

"..तो सांगतो, गोवा जगण्यासाठी छान जागा"! दिग्गज ऑफस्पिनर हरभजन सिंगने व्यक्त केले प्रेम; गोव्यात खेळणार लीजेंड्स T20 लीग

SCROLL FOR NEXT