j
गोवा

पत्रकारावर दबावप्रकरणी "गुज'कडून गंभीर दखल

Dainik Gomantak

म्हापसा

एका खासगी वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी संतोष पाटील यांना धाक दाखवून तसेच दबाव आणून ते चित्रीकरण डिलिट करण्यास भाग पाडल्याप्रकरणी गोवा श्रमिक पत्रकार संघटनेने (गुज) ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो यांच्या कृतीबाबत तीव्र नाराजी व्यक्‍त केली असून, यासंदर्भात त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागण्यात आले आहे.
यासंदर्भात "गुज'चे अध्यक्ष राजतिलक नाईक यांच्याकडे पत्रकार पाटील यांनी तक्रार दिल्यानंतर यासंदर्भात गुजतर्फे लोबो यांना पत्र पाठवून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी पेडे-म्हापसा येथील एका नियमबाह्य इमारत प्रकल्पाची शासकीय अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जात असताना हा प्रकार घडला होता. निवासी इमारतीत व्यावसायिक आस्थापने चालत असल्याच्या तक्रारी त्यासंदर्भात उत्तर गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाकडे गेल्या होत्या व त्यामुळे एक मंत्री, दोन आमदार व प्राधिकरणाचे अधिकारी पाहणी करण्यासाठी तिथे आले होते.
मंत्री, आमदार व संबंधित सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एका इमारतीची पाहणी केल्यास त्याला खासगी कार्यक्रम कसे काय म्हणता येईल, असा सवालही राजतिलक नाईक यांनी लोबो यांना केला आहे. कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्याने धाक दाखवून ड्युटीवरील पत्रकारावर व्हिडिओ फूटेज डिलिट करण्याचा दबाव आणल्याने या प्रकाराची गुजने गंभीर दखल घेतल्याचेही या पत्रातून मंत्री लोबो यांना कळवण्यात आले आहे. हा बळजबरी करण्याचा प्रकार असून, वृत्तपत्र स्वातंत्र्यावर हा आघात आहे, असेही संघटनेने मंत्री लोबो यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
पत्रकारांना या ठिकाणी छायाचित्रण अथवा व्हिडिओ चित्रीकरण करता येणार नाही; कारण, हा खासगी कार्यक्रम आहे असे त्या वेळी मंत्री लोबो यांनी उपस्थित पत्रकारांना बजावले होते. आपण जेव्हा खासगी कार्यक्रमास उपस्थित असतो तसेच घरी असतो तेव्हा व्हिडिओ शूटिंग करता येत नाही, असेही लोबो यांनी त्या पत्रकारास बजावले होते.
वादग्रस्त ठरलेल्या त्या इमारत प्रकल्पाची शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यासाठी ग्रामीण विकासमंत्री मायकल लोबो, म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा आणि हळदोणेचे आमदार ग्लेन टिकलो उपस्थित होते. ती पाहणी करतानाच्या प्रसंगाचे चित्रीकरण केल्यानंतर ती व्हिडिओ फूटेज कॅमेऱ्यातून डिलिटकरण्यास पत्रकारावर दबाव आणला. मोठा दबाव आल्याने ते चित्रिकरण डिलिट करून त्या पत्रकाराने नमते घेतले, असे गुजने स्पष्ट केले आहे.


 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pallavi Dempo: पल्लवी धेंपे म्हणतात... मला गरिबांच्या समस्या कळतात!

Mysterious Artefact Found In Goa: पणजीत आढळलेल्‍या मूर्तीवर करणार कार्बन प्रक्रिया : नीलेश फळदेसाई

High Tide Alert For Panaji: पणजीसाठी 22 दिवस धोक्याचे; पावसाळ्यात उसळणार 4.5 मीटरपेक्षा अधिक उंच लाटा

Vishwajit Rane On Congress: काँग्रेसने काय दिवे लावले? विश्वजीत राणेंचा घणाघात

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

SCROLL FOR NEXT