Pallavi Dempo: पल्लवी धेंपे म्हणतात... मला गरिबांच्या समस्या कळतात!

Pallavi Dempo: समाज कल्याण हे आपले आवडते क्षेत्र असून जनकल्याणासाठी मी राजकारणात आली आहे. हे काम करताना आपला अनेकांशी संबंध येत असतो.
Pallavi Dempo
Pallavi DempoDainik Gomantak

Pallavi Dempo

आपण जरी एका श्रीमंत कुटुंबाची कन्या व सून असले, तरी गेली २६ वर्षे मी समाजकल्याण क्षेत्रात वावरत आहे.

समाज कल्याण हे आपले आवडते क्षेत्र असून जनकल्याणासाठी मी राजकारणात आली आहे. हे काम करताना आपला अनेकांशी संबंध येत असतो.

त्यात गरीबसुद्धा असतात. गरिबांना सहकार्य करणे हे आपले कर्तव्य आहे, या निर्मळ भावनेनेच आपण कार्यरत आहे. त्यामुळे आपल्याला गोरगरिबांच्या भावना नक्कीच कळतात, असे भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण गोव्यातील उमेदवार पल्लवी धेंपे यांनी एका मुलाखती दरम्यान स्पष्ट केले.

वातानुकूलित खोलीत बसून काम करणारी महिला उन्हात कसा काय प्रचार करेल, अशी जी टिका होत आहे, हासुद्धा चुकीचा समज आहे. जे कोण असे म्हणतात, त्यांनी आपल्या सोबत प्रचार कार्यात सहभागी व्हावे. आपण सकाळी ९ ते रात्री ११.३० ते १२ पर्यंत लोकांसमवेतच असते. दुपारचे जेवणसुद्धा कार्यकर्त्यांसमवेत घेते. एका महिन्यात आपण दक्षिण गोव्यातील वीसही मतदारसंघाचा दौरा केला.

आपल्या सोबत ज्येष्ठ नागरिक, मुले, युवक, महिला व पुरुष वर्ग असतो. आपण लोकांना उपलब्ध होणार नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. आताच नव्हे, तर निवडून आल्यावर पुढील पाच वर्षांत आपण सर्वांगाचा सहज उपलब्ध होणार आहे.

आपण जर उपलब्ध नसते, तर सामाजिक व आता राजकीय क्षेत्रात उतरलेच नसते. दक्षिण गोव्यातील लोकांना आपले प्राधान्य असेल. मडगाव आपण कचेरी सुरू करणार आहे. तिथे लोक आपल्याला अवश्य भेटू शकतील, असेही पल्लवी धेंपे यांनी या वेळी सांगितले.

Pallavi Dempo
Goa Dam : पावसाळ्यापर्यंत राज्यात पाणीटंचाईची शक्यता नाही; धरणांमध्ये पुरेसा जलसाठा

मोदी हे सर्वसामान्याचे नेते असून ते भारताचे विकास, विश्र्वास व भविष्य असून आपल्याला मत म्हणजे मोदींना मत असे समजून दक्षिण गोव्यातील लोकांनी कमळाला मत द्यावे, राजकारण ही एक जबाबदारी असते, लोकांच्या कल्याणाची जबाबदारी असते, असे मानूनच आपण राजकारणात प्रवेश केला असून ही जबाबदारी निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडणार, असेही पल्लवी धेंपे यांनी सांगितले.

कुटुंबीयांचाही पाठिंबा

भारतीय जनता पक्षातील मंत्री, आमदार, नेते, कार्यकर्त्यांचा आपल्याला पूर्ण पाठिंबा असून प्रत्येक जण एकत्रितपणे आपल्याला सहकार्य, मदत करीत असून आपल्याला प्रोत्साहन देत आहेत.

सगळेच जण प्रामाणिकपणे प्रचार कार्यात सहभागी होत आहेत, असेही त्यांनी सांगितले. आपल्याला या कामी पती श्रीनिवास धेंपे, मुले इतर कुटुंबीयांचा सुद्धा पूर्ण पाठिंबा असल्याचे व ते सर्वजण आपल्या प्रचार कार्यात मदत करतात, असेही पल्लवी म्हणाल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com