Shivkumar Dhurve | Serial Killer | Goa Crime News
Shivkumar Dhurve | Serial Killer | Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime : मध्यप्रदेशातील सिरीअल किलर शिवप्रसाद धुर्वेचं गोवा कनेक्शन

आदित्य जोशी

Goa Crime : मध्य प्रदेशमधील सागर येथे अटक करण्यात आलेल्या एका 19 वर्षीय सिरिअल किलर आरोपीचं गोवा कनेक्शन आता समोर आलं आहे. शिवप्रसाद धुर्वे असं या आरोपीचं नाव असून नुकतीच मध्य प्रदेश पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने 4 सुरक्षारक्षकांची हत्या करुन एकाला गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे. मात्र आता गोवा पोलिसही या आरोपीची चौकशी करणार आहे.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आरोपी शिवप्रसाद हा यापूर्वी गोव्यात काम करत होता. मात्र काही काळापूर्वीच तो मध्यप्रदेशात आपल्या गावी परतला होता. गावी परतल्यानंतर त्याने मध्य प्रदेशातील सागर परिसरात 4 सुरक्षा रक्षकांची हत्या केली, तसंच एकाला गंभीर जखमीही केलं. याच आरोपात पोलिसांनी शिवकुमारला अटक केली होती. मात्र आता गोवा पोलिसांना याच आरोपीची चौकशी करायची आहे. गोव्यात अशाच प्रकारच्या हत्याकांडात संबंधित आरोपीचाच हात असल्याचा गोवा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे पोलिस आता आरोपी शिवप्रसादची चौकशी करणार आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका आरोपीचं असंच गोवा कनेक्शन समोर आलं होतं. मुंबईतील एका मच्छिमाराची हत्या करणाऱ्या आरोपीबाबत एक खुलासा समोर आला होता. मुंबईतील 55 वर्षीय मच्छिमाराची बाबूलनाथ परिसरात 23 वर्षीय सेक्युरिटी गार्डने डोक्यात दगड घालून हत्या केली होती. तपासामध्ये 2020 साली त्याने गोव्यातही अशाच प्रकारे हत्या केल्याचं उघड झालं होतं.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरज यादव नावाच्या आरोपीने रागाच्या भरात मच्छिमाराची निर्घृण हत्या केली होती. इतकंच नाही तर घटनास्थळावरुन निघताना आरोपीने आपलं नावही त्याठिकाणी लिहून ठेवलं होतं. मूळचा मध्यप्रदेशचा राहणाऱ्या सुरजने मुंबादेवी परिसरात एक दिवसासाठी सुरक्षारक्षकाचं काम केलं होतं. कामावरुन निघण्यापूर्वी एक दिवस आधी त्याने मच्छिमाराची हत्या केली. ताडदेवमधील एका एजन्सीने त्याला सुरक्षारक्षकाच्या कामासाठी ठेवलं असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या दोन्ही घटनांमध्ये गोवा आणि मध्यप्रदेश कनेक्शन यात साम्य आहे. त्यामुळे गोवा पोलिस आता याच घटनेप्रमाणे आरोपी शिवप्रसादची चौकशी करणार आहेत. या तपासात नेमकं काय निष्पन्न होतं हे येत्या काही काळात स्पष्ट होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bomb Threat At Dabolim Airport: दाबोळीवर बॉम्ब असल्याची धमकी, यंत्रणा सतर्क; सुरक्षेत वाढ

Theft In Bodgeshwar Temple: बोडगेश्वर मंदिरात पुन्हा मोठी चोरी; फंडपेटी फोडून 12 लाखांची रोकड लंपास

Taleigao Election Result: ताळगावमधून युनायटेड ताळगावकरचा सुफडा साफ, मंत्री बाबूश यांचे पॅनल विजयी

Sattari News : सत्तरीत तालुक्यात नदी परिसरात जिलेटिनचा धोका वाढला; जलप्रदूषणाची शक्यता

Air Pollution: वायू प्रदूषणानं वाढवली चिंता! टाईप 2 डायबिटीजच्या रुग्णांमध्ये तब्बल एवढ्या टक्क्यांनी वाढ; संशोधनातून खुलासा

SCROLL FOR NEXT