Serendipity Arts Festival 2024 Dainik Gomantak
गोवा

Serendipity Arts Festival: 'सेरेंडिपिटी'मध्ये रंगला अनोखा उपक्रम; मुलांनी गिरवले शाश्वत वास्तूरचनेचे धडे

Serendipity Arts Festival Workshop: प्राचीन कलेची प्रेरणा घेत, सेरेंडिपिटी कला महोत्सव २०२४ मध्ये आभत स्टुडिओ, थिंकआर्ट्स आणि बुकवर्म गोवा यांनी एकत्र येऊन अनोखा प्रकल्प सादर केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Serendipity Arts Festival Eco-Friendly Construction Workshop

पणजी: प्राचीन कलेची प्रेरणा घेत, सेरेंडिपिटी कला महोत्सव २०२४ मध्ये आभत स्टुडिओ, थिंकआर्ट्स आणि बुकवर्म गोवा यांनी एकत्र येऊन अनोखा प्रकल्प सादर केला आहे. या उपक्रमातून मुलांना शाश्वत तंत्र आणि सर्जनशील अभिव्यक्तीशी जोडत, पर्यावरणपूरक बांधकाम पद्धती आणि समृद्ध अनुभव दिला जातो. आधुनिक पर्यावरणीय समस्यांच्या संदर्भात या पद्धतींचे महत्त्व सांगताना आभत स्टुडिओच्या भावना जयमिनी म्हणाल्या, "मुलांना केवळ तंत्र शिकवणे एवढेच नाही, तर प्राचीन पद्धती आजच्या जगात कशा लागू होऊ शकतात, हे जाणून घेण्याची जिज्ञासा त्यांच्यात जागृत करणे महत्त्वाचे आहे" .

शाश्वत वास्तूरचना आणि पारंपरिक बांधकाम पद्धती जतन करण्यासाठी आभत स्टुडिओ प्रसिद्ध आहे. वॅटल (लवचिक फांद्यांच्या विणकामाची कला) आणि डॉब (मातीचा थर पृष्ठभागावर लावण्याची पद्धत) यांसारख्या पारंपरिक पद्धती त्यांनी मुलांना शिकवल्या

पणजीमधील बुकवर्म- गोवा ही मुलांसाठी कार्य करणाऱ्या अग्रगण्य संस्थांपैकी एक आहे. मुलांना पुस्तकांशी जोडून विविध सर्जनशील प्रकारांचा अनुभव देण्याच्या बाबतीत त्यांनी आपली एक खास जागा निर्माण केली आहे. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून, त्यांनी वास्तुशास्त्र, निसर्ग आणि संवर्धन यांसंबंधी पुस्तके मुलांच्या या कार्यशाळांमध्ये समाविष्ट केली आहेत. कला आणि कथांद्वारे मुलांना नवीन कल्पना शोधण्यासाठी त्यातून प्रोत्साहन दिले गेले.

कोलकाता येथील थिंकआर्ट्स ही संस्था कलात्मक अभिव्यक्तीसाठी प्रसिद्ध आहे, यांनीही या सहकार्याचा भाग म्हणून शाश्वतता आणि समुदाय यांच्याशी जुळणाऱ्या कार्यशाळा घेतल्या. या कार्यशाळेत कला, संगीत आणि कथाकथन याद्वारे मुलांना स्व-अभिव्यक्तीसाठी एक सर्जनशील माध्यम मिळाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT