Serendipity Arts Festival Dainik Gomantak
गोवा

Serendipity Arts Festival: सेरेंडिपिटी सार्वजनिक कला प्रकल्पांसाठी प्रस्ताव मागवण्यात सुरुवात

आपल्या कलाकृतीत, आपली भूमी आणि आपले पर्यावरण यांना सातत्याने स्थान देणाऱ्या कलाकारांना, त्यांच्या कलाकृती गोव्यात होणाऱ्या सेरेंडिपिटी उत्सवात मांडण्यासाठी आयोजकांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.

दैनिक गोमन्तक

Serendipity Arts Festival: आपल्या कलाकृतीत, आपली भूमी आणि आपले पर्यावरण यांना सातत्याने स्थान देणाऱ्या कलाकारांना, त्यांच्या कलाकृती गोव्यात होणाऱ्या सेरेंडिपिटी उत्सवात मांडण्यासाठी आयोजकांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.

सेरेंडिपिटी उत्सवाचा महत्त्वाचा भाग असलेल्या ‘सार्वजनिक कला प्रकल्पांत’ या कलाकृती मांडल्या जातील व त्यासाठी निवडल्या गेलेल्या गोव्यातील चार कलाकारांना सेरेंडिपिटीमार्फत ३ लाख रुपयापर्यंतचे अनुदान दिले जाईल.

‘द आयलॅण्ड दॅट नेव्हर गेट्‍स फ्लड’ या सेरेंडिपिटीच्या उपक्रमाद्वारे महोत्सवाच्या काळात, पणजी शहरात कलात्मक कलाकृतींची उभारणी होते. शहरातील विशिष्ट स्थानाना पुरक असलेल्या आणि सखोल अभिव्यक्ती निर्माण करणाऱ्या कलात्मक प्रकल्पाची अपेक्षा या उपक्रमाद्वारे सेरेंडिपिटी कलाकारांकडून करत असते.

विशिष्ट जागी मांडलेल्या या कलाकृती त्या जागेचे आयाम कलात्मकपणे बदलतात आणि शहराच्या वास्तूरचनेला कल्पनारम्य असा स्तर बहाल करतात.

ज्या कलाकारांनी पर्यावरण आणि भूमीविषयी आपली भूमिका आपल्या निर्मितीमधून नेहमी मांडली आहे त्यांना त्यांचे विद्यमान काम विकसित करण्यासाठी किंवा त्यांच्या नवीन निर्मितीसाठी प्रोत्साहन म्हणून हे अनुदान दिले जाईल.

कलाकारांनी पर्यावरण संबंधित विविध पर्याय सुचवणाऱ्या ज्ञान प्रणालींचा शोध आपल्या माध्यमांतून घेणे, पर्यावरणीय बदलांवर प्रकाश टाकणे, समुदायाला अशा कार्यात सहभागी करून घेणे व इतरांमध्ये पर्यावरणाबद्दल सक्रियता निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

‘इमर्सिव्ह टेक्नोलॉजी’चा (डिजिटल आभासी आणि प्रत्यक्ष यांचे मिश्रण करून) वापर करून सार्वजनिक जागांवर निर्माण होऊ शकणाऱ्या कला-प्रकल्पांना पाठबळ देण्यासाठी सेरेंडिपिटी अधिक उत्सुक आहे. या अनुदानासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ सप्टेंबर २०२३ आहे. इच्छुकांना  https://serendipityarts.org/grant/public-art या लिंकवर नोंदणी करता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT