Bhandari Samaj Dainik Gomantak
गोवा

Bhandari Community In Goa: ‘भंडारी’ नेतृत्वाला चेकमेट; आठ दिवसांत नवी समिती

Bhandari Samaj: बेतोडा - फोंडा येथे सनग्रेस गार्डन सभागृहात झालेल्या या स्नेहमेळाव्याला भंडारी समाज प्रतिनिधींची प्रचंड उपस्थिती

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: भंडारी समाजाची एकजूट कायम राखताना आठ दिवसांच्या आत समाजाचे ज्येष्ठ नेते आणि प्रतिनिधींची एक स्थायी समिती निवडावी आणि या समितीने अशोक नाईक व इतरांच्या समितीशी चर्चा करून समाजाच्या हितासाठी निर्णय घ्यावेत.

लवकरात लवकर समाजाची निवडणूक घेणे तसेच अशोक नाईक आणि इतरांनी समाजबांधवांना विश्‍वासात न घेता घटनेत जे नियम केले आहेत, ते बदलणे असे दोन महत्त्वाचे ठराव भंडारी समाज बांधवांच्या स्नेहमेळाव्यात घेण्यात आले. बेतोडा - फोंडा येथे सनग्रेस गार्डन सभागृहात झालेल्या या स्नेहमेळाव्याला भंडारी समाज प्रतिनिधींची प्रचंड उपस्थिती लाभली होती.

यावेळी भंडारी समाजाचे ज्येष्ठ नेते तथा कृषिमंत्री रवी नाईक, माजी जलस्रोतमंत्री दयानंद मांद्रेकर, माजी सहकारमंत्री महादेव नाईक, विद्यमान आमदार वीरेश बोरकर, माजी आमदार लवू मामलेदार, दयानंद सोपटे, जयेश साळगावकर, किरण कांदोळकर यांच्यासह राजकीय व सामाजिक, व्यावसायिक क्षेत्रातील इतर मान्यवरांचा समावेश या स्नेहमेळाव्यात होता.

स्नेहमेळाव्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना रवी नाईक, संजीव नाईक, गुरुनाथ ऊर्फ भाई नाईक, दिलीप नाईक, रोहिदास नाईक, प्रकाश नाईक, रामकृष्ण नाईक यांनी समाजहितासाठी सर्व बांधव एकत्रित आल्याचे नमूद केले.

... तर समाजबांधवच योग्य निर्णय घेतील!

रवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ सदस्यांच्या समितीने अशोक नाईक यांच्या समितीशी चर्चा करून लवकरात लवकर निवडणूक घेणे, तसेच समाजाच्या हिताच्या आड येणारे नियम काढून टाकण्यासाठी चर्चा करण्याचे महत्त्वाचे दोन ठराव यावेळी संमत झाले. अशोक नाईक तसेच इतरांकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास समाज बांधवच पुढील निर्णय घेतील, असे यावेळी सांगण्यात आले.

रवींनी दाखविली ताकद...

भंडारी समाजाचे नेते तथा फोंड्याचे आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक यांनी या स्नेहमेळाव्यात आपली राजकीय ताकद दाखविली. रवी नाईक यांनी मारलेल्या एका हाकेला प्रतिसाद देत राज्यभरातील भंडारी बांधव एकत्रित झाले. सनग्रेस गार्डनचे प्रशस्त सभागृह तुडुंब भरले होते. जागा उपलब्ध न झाल्यामुळे काही समाज बांधव सभागृहाबाहेर उभे होते.

समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांचे ‘नो कमेंटस्’

गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी या स्नेहमेळाव्यासंबंधी ‘नो कमेंटस्’ असे उत्तर दिले. भंडारी समाजाच्या उत्कर्षासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु अधिक बोलण्यास अशोक नाईक यांनी नकार दिला. त्यांच्या या मौनाविषयी विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.

समाज बांधवांची प्रचंड उपस्थिती

बेतोडा येथील भंडारी समाजाच्या या स्नेहमेळाव्याला समाज बांधवांची प्रचंड उपस्थिती लाभली. राज्यातील बाराही तालुक्यांमधील भंडारी समाजाचे प्रतिनिधी, कार्यकर्ते आणि बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच इतर व्यावसायिक क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश होता. खास करून महिला आणि युवा प्रतिनिधींचा भरणा मोठ्या प्रमाणात होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 06 July 2025: नवे काम सुरू कराल, प्रेमसंबंध मजबूत होतील; खर्च मात्र जपून करा

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

SCROLL FOR NEXT