सुदिन ढवळीकर, Sudin Dhavalikar news Dainik Gomantak
गोवा

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सुदिन ढवळीकर यांना विनंती केल्याचा दावा

पाठिंब्याचा निर्णय ‘मगो’ कार्यकारिणीचा

दैनिक गोमन्तक

फोंडा: मगो पक्षाचा भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय हा एकट्या सुदिन ढवळीकर यांचा नसून, मगो पक्ष कार्यकारिणीचा आहे. भाजपच्या वरिष्ठ केंद्रीय नेत्यांनी विनंती केल्यानुसारच हा पाठिंबा विनाअट दिल्याची माहिती मगो पक्षाने बांदोडा - फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मगो पक्ष केंद्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी प्रताप फडते, अनंत नाईक, नरेश गावडे तसेच शिवानंद सावंत, निधी मामलेकर व सलोनी गावडे आदी उपस्थित होते. (Sudin Dhavalikar news)

प्रताप फडते यांनी राज्यातील मतदारांनी मगो पक्षाला दिलेल्या सहकार्याबदल आभार व्यक्त करताना मगो पक्षाचे गोव्याच्या आणि गोमंतकीयांच्या हितासाठीचे निरंतर सुरूच राहणार असल्याची ग्वाही दिली.

मगो पक्षाने भाजपला पाठिंबा देण्याचा घेतलेला निर्णय हा मगोच्या केंद्रीय कार्यकारिणीने बैठकीत घेतला असून त्याबदलची माहिती भाजपच्या फोंडा प्रियोळ शिरोडा व मडकई मंडळाला माहीत नाही त्यामुळेच त्यांनी थयथयाट केला आहे. अगोदर माहिती करून घ्या आणि मगच वक्तव्य करा असा सल्ला प्रताप फडते यांनी दिला.निधी मामलेकर यांनी मगो उमेदवारांच्या प्रचारात मगोचे नेते सुदिन ढवळीकर(Sudin Dhavalikar) कुठेही कमी पडले नाही. पण, वेळ कमी पडला असे फोंड्याचे उदाहरण देताना स्पष्ट केले.

म्हणून भंडारी समाजाची मते फुटली

अनंत नाईक म्हणाले की फोंडा, प्रियोळ आणि डिचोली(Dicholi) या तिन्ही मतदारसंघात मगोचा थोडक्यात विजय हुकला. काही ठिकाणी मगो उमेदवारांच्या नातेवाईकांनी तसेच ‘आरजी’ या पक्षाच्या उमेदवारांमुळे मगोची मते घटली. त्यामुळेच मगोचा तीन मतदारसंघात हाती आलेला विजय निसटला. प्रियोळ मतदारसंघात आरजीचा भंडारी समाजाचा उमेदवार उभा केल्याने येथील मगोची काही प्रमाणात भंडारी समाजाची मते फुटली, असेही अनंत नाईक म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT