self-baggage drop feature at Manohar International Airport Dainik Gomantak
गोवा

Manohar International Airport : मोपा विमानतळावर अद्ययावत ‘चेक ईन’; सेल्फ सर्व्हिस

मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुविधेत भर

दैनिक गोमन्तक

self-baggage drop feature : मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांच्या प्रवास सुकर होण्यासाठी 'चेक-ईन’ प्रक्रिया अद्ययावत केली आहे. या सेवेमुळे प्रवाशांचे बॅगांसह अन्य साहित्य अल्पावधीत तपासणी होऊन अॅटोमेटिक चेनद्वारे योग्य स्थळी पोहोचते.

जीएमआर गोवा संचालित या आंतरराष्ट्रीय विमानतळावर अत्याधुनिक तपासणी सुविधांमुळे प्रवाशांच्या अनुभवात लक्षणीय वाढ झाली आहे. विमानतळाने सुमारे 40 टक्के प्रवाशांनी सेल्फ-सर्व्हिस बॅग ड्रॉप्स आणि 47 टक्के कॉमन यूज सेल्फ सर्व्हिस किओस्कचा प्रभावी वापर केला आहे, ज्यामुळे चेक-इन प्रक्रियेत क्रांती घडली आहे.

या विमानतळाच्या प्लॅटफॉर्मसाठी नोंदणी केलेल्या सर्व एअरलाइन्ससाठी ही सुविधा लागू झाली आहे. ग्राउंड स्टाफवरील अवलंबित्व कमी केले आहे.

जलद तपासणी प्रक्रिया

‘एसबीडी’चा वापर करणाऱ्या प्रवाशांना चेक-इन प्रक्रिया स्वतंत्रपणे पूर्ण करण्याचा अधिकार दिला जातो. ते त्यांचे बोर्डिंग पास मिळवू शकतात, बॅग टॅग प्रिंट करू शकतात आणि विमानतळ कर्मचाऱ्यांच्या मदतीशिवाय त्यांचे सामान तपासू शकतात. हा स्वयंसेवा दृष्टीकोन प्रवाशांची स्वायत्तता वाढवतो आणि संपूर्ण चेक-इन प्रक्रिया जलद करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'अखेरपर्यंत त्याच्या मनात 'ती' सल राहिली', वर्षा उसगावकर यांनी सांगितला लक्ष्मीकांत बेर्डेच्या आयुष्यातील माहित नसलेला किस्सा

Kendra Trikon Rajyog 2026: ''प्रमोशन, प्रॉपर्टी अन् पैशाचा होणार पाऊस'', केंद्र त्रिकोण राजयोग 'या' 3 राशींचं रातोरात पालटणार नशीब

Goa Fire Accident: मध्यरात्री आगीचा तांडव! म्हावळींगेत दुकान जळून खाक, 'इतक्या' लाखांचं नुकसान; सुदैवानं मोठी जीवितहानी टळली

T20 World Cup 2026: "भारत वर्ल्ड कप जिंकणार नाही!" सेमीफायनलचं तिकीट पक्क करताच पाकिस्तानी खेळाडूचा जळफळाट Watch Video

T20 World Cup 2026: "नुसतं स्टार असून चालत नाही..." वर्ल्ड कपमधील अभिषेक शर्माच्या 'फ्लॉप शो' वर भडकला भारतीय दिग्गज

SCROLL FOR NEXT