goa youth 
गोवा

कोरोनाचा वाढता कहर बघता गोव्यातील तरुणांनी केला डिजिटल सपोर्ट

दैनिक गोमंतक

पणजी: सध्या राज्यातील कोरोना महामारीची दुसरी लाट तीव्र बनलेली असून मोठ्या संख्येने रुग्णसंख्या वाढू लागलेली आहे. तसेच बळीही जाऊ लागले आहेत. त्यामुळे आरोग्य सेवेवर ताण येऊ लागला असून बाधित रुग्णांच्या आवश्यक गरजांची पूर्ती करताना धांदल उडू लागली आहे. याबाबतीत सरकार आपल्यापरीने प्रयत्न करत असले, तरी रुग्णांची व त्यांच्या कुटुंबियांची आबाळ होऊ नये यासाठी आता राज्यातील तरुणाईही पुढे सरसावली असून त्याकरिता समाजमाध्यमांचा प्रभावीरीत्या वापर करण्यात येत असल्याचे दिसून येऊ लागले आहे. (Seeing the growing devastation of Corona, the youth of Goa offered digital support)

राज्यातील कोविड इस्पितळातील खाटा भरून गेलेल्या असून चाचण्या करून घेण्यासाठीही मोठ्या रांगा लागू लागल्या आहेत. यामुळे चाचण्यांचे निकाल लवकर मिळणे कठीण होऊ लागले आहे. अशा परिस्थितीत मदत करण्यासाठी मागील काही दिवसांत समाजमाध्यमांवर विविध गट सक्रिय झाले असून कोरोनाचे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांचा मोठा आधार होऊ लागला आहे. समाजमाध्यमांवरील या गटांकडे सध्या मदतीसाठी विनंत्यांचा ओघ लोटू लागला आहे. यात इस्पितळात खाटा, ऑक्सिजन बेड, ऑक्सिजन सिलेंडर, रेमडेसिविर, कोविड चाचण्या, नजीकचे चाचणी केंद्र किंवा प्लाज्मा दानाविषयी विचारणा होत आहे.

या गटांच्या आणि त्यातील सदस्यांच्या मदतीमुळे अनेक रुग्णांना आणि कुटुंबियांना आवश्यक मदत वेळीच मिळू शकलेली आहे. अशीच एक स्वयंसेविका असलेली तरुणी आपल्या परीने रुग्णांना मदत करण्यासाठी धडपडत असून ती शिजविलेले अन्न किंवा किराणामाल, औषधे यासारख्या वस्तू इस्पितळात असलेल्या अथवा घरी विलगीकरणात राहणाऱ्या रुग्णांना मोफत पुरवत आहे. ती स्वतः एकट्यानेच हे मदतीचे काम करत आहे.

‘गोवा हे आपले घर आहे. ज्या लोकांच्या घरातील सर्व सदस्य कोरोनाबाधित झालेले आहेत अशांना आपण औषधे आणि किराणा माल मिळवून देण्यास मदत करत आहे. दुकानातून घरापर्यंत माल पोहोचता करणे ही संकल्पना अजूनही राज्यात रूढ झालेली नाही. त्यामुळे आपण याबाबतीत मदत करण्यास पुढे सरसावण्याचे ठरविले. आपल्याला वाहन चालवता येत असल्याने आपण आणखी चांगल्या प्रकारे मदत करू शकलेले आहे’, असे तिने सांगितले. काही गटांतील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोज शंभरहून अधिक संदेश व कॉल्स त्यांना समाजमाध्यमावर विविध व्यासपीठांवरून येऊ लागले असून मागील चार-पाच दिवसांत त्यांची संख्या आणखी वाढली आहे.

20 स्वयंसेवकांचा गट
अशाच प्रकारे वैयक्तिक पातळीवरील मदतकार्यातून सुरवात केलेल्या अन्य एका तरुणीने आता 20 हून अधिक स्वयंसेवकांचा गटच तयार केला आहे. कोरोना रुग्णांना आवश्यक मदत मिळावी यासाठी त्यांच्याकडून प्रसंगी डॉक्टरांशी समन्वय राखला जातो. सदर तरुणीने राज्यातील कोविड रुग्णांची आवश्यकता जाणून घेण्यासाठी आणि त्यानुसार मदत करण्यासाठी आता ट्विटरचा आधार घेत तेथील आपल्या खात्यावरही एक लिंक दिलेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

Bicholim Marigold Farming : डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT