Shivaji Maharaj Dainik Gomanatak
गोवा

Shivacharitra: शिवचरित्रात भारतीय लोकशाहीचे बीज

Shivacharitra: ॲड. शिवाजी देसाई: ठाणे सार्वजनिक गणेशोत्सवात व्याख्यानाचा कार्यक्रम

दैनिक गोमन्तक

Shivacharitra: छत्रपती शिवाजी महाराजांनी वतनदारी पद्धत खालसा केली. याच नीतीचा वापर करून भारतीय स्वातंत्र्यानंतर 565 संस्थाने तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी भारतात विलीन गेली आणि एकसंध भारत निर्माण करण्याची दिशा ठरविली. सर्व समाजाला एकत्र करून त्या समाजाला एका सूत्रामध्ये बांधण्याची शिकवण शिवचरित्र देत असते.

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शिवचरित्र प्रेरणादायी आहे. त्यासाठी प्रत्येकाने शिवचरित्रातून आपल्या जीवनाची दिशा ठरवायला हवी. शिवचरित्रात भारतीय लोकशाहीचे बीज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध शिवव्याख्याते ॲड. शिवाजी देसाई यांनी केले. ठाणे - सत्तरी येथील सार्वजनिक गणेशोत्सवात वर्ष पद्धतीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकानंतरची साडेतीनशे वर्षे’ या विषयावरील व्याख्यान कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते या नात्याने बोलत होते.

ठाणे - सत्तरी येथील सार्वजनिक गणेशोत्सवातील ॲड. देसाई यांच्या व्याख्यानमालेचे हे दहावे वर्ष होते. याप्रसंगी ठाणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग गावकर, अर्जुन गावकर, सुहास नाईक, गोपाळ नाईक, झिलबाराव देसाई, चंद्रकांत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

ॲड. शिवाजी देसाई पुढे म्हणाले, की त्या काळात जरी राजेशाही असली तरी लोकशाही प्रणालीला शिवरायांच्या राज्यात अधिक स्थान होते. अनेक निर्णय शिवराय आपले मंत्रिमंडळ तसेच त्यांच्या मातोश्रीशी सल्ला मसलत करून घेत असत. न्यायप्रणालीमध्ये देखील निवाडा देत असताना कोणावरही अन्याय होणार नाही याची जाणीव ठेवूनच न्याय निवाडा होत असे. अपराधी व्यक्तीला त्याची बाजू मांडण्याची संधी मिळत असे.

‘शिवरायांच्या रणनीतीचा विदेशातही वापर’

छत्रपती शिवरायांकडे सूक्ष्म दृष्टी आणि दूरदृष्टी होती. छत्रपती शिवराय प्रत्येक गोष्टीचा सूक्ष्म दृष्टीने विचार करत होते. त्यांच्या राज्यकारभारातील अधिकाऱ्यांची निवड अत्यंत हुशारीने ते करायचे. शिवरायांची रणनीती आज विदेशामध्ये तसेच भारतीय सैन्य देखील अवलंबत आहे. व्हिएतनामसारखा देश शिवरायांची रणनीती वापरून अमेरिकेला शिकस्त देत आहे, अशी माहिती ॲड. देसाई यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT