Colvale Jail  Dainik Gomantak
गोवा

कोलवाळ तुरुंगातील सुरक्षा रक्षकच असुरक्षित!

कैद्यांकडे वारंवार ड्रग्स, मोबाईल सापडतात.

दैनिक गोमन्तक

म्हापसा: कोलवाळ मध्यवर्ती तुरुंगात दोन दिवसांपूर्वी नायजेरियन महिला कैद्याकडून महिला सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. पण या केंद्रीय कारागृहातील प्रशासनाने कोलवाळ पोलिस स्थानकात यासंबंधी तक्रारच नोंदवली नाही. त्यामुळे येथील सुरक्षा रक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

केंद्रीय कारागृहामध्ये वारंवार कैद्यांमध्ये मारामारी, भांडणे होत असतात. तसेच कैद्यांकडे वारंवार ड्रग्स, मोबाईल सापडतात. कधी कधी कैदी सुरक्षा रक्षकांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशा प्रकारांमुळे हे कारागृह नेहमीच चर्चेत राहिले आहे. एप्रिल महिन्यात येथील कैद्यांकडून डॉक्टरांना मारहाणीचा प्रकारही घडला होता.

कोविड काळात कारागृहात कैद्यांना भेटण्यासाठी नातेवाईकांना परवानगी देणे बंद केले आहे. तसेच बाहेरील लोकांना भेटण्याची सुविधा पुन्हा सुरू करावी, या मागणीसाठी ही धक्काबुक्की घडवून आणण्यात आली. जेवणाच्या दर्जावरूनही येथे मारहाण झाली आहे. नातेवाईकांच्या भेटीसाठी उपद् व्याप

कारागृह प्रशासनाने कैद्यांच्या मागण्या पोलिस महानिरीक्षकांना पत्राद्वारे कळविल्या आहेत. कारागृहात जाऊन नातेवाईकांनी कैद्यांची भेट घेण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. ही सुविधा पुन्हा सुरू करण्यासाठीच कारागृहात हाणामारी, धक्काबुक्की घडवून आणली जाते. परंतु कारागृह प्रशासन, पोलिस महानिरीक्षक किंवा उच्चस्तरीय समितीकडून यासंबंधी कोणत्याही प्रकारचा निर्णय होत नाही, तोपर्यंत सध्या लागू असलेली बंदी मागे घेता येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MRF Recruitment: नोकरभरती वादावर अखेर पडदा! 'एमआरएफ' कडून गोमंतकीय तरुणांना प्राधान्य; फर्मागुढीत मुलाखतींचं आयोजन

BCCI Election: 'बीसीसीआय' निवडणुकीसाठी 'GCA'चा प्रतिनिधी ठरेना; कोर्टानं दिला 'हा' आदेश

बिट्स पिलानीमध्ये पाच नव्हे सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू, युरी आलेमाव यांचा दावा; आकाश गुप्ताचा मृत्यू का लपवला?

Uttar Pradesh Crime: धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थ्याने स्वतःच केली लिंगबदल शस्त्रक्रिया, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल

All-Time Asian T20 squad: ऑल टाईम टी-20 आशिया संघ जाहीर, रोहित-विराटसह 5 भारतीय खेळाडूंचा समावेश; बाबरला वगळंल

SCROLL FOR NEXT