Goa Police Dainik Gomantak
गोवा

Israel War Impact: इस्रायली धार्मिकस्‍थळी सुरक्षा

Israel War Impact: युद्धाचा परिणाम : पाळोळेत असते मोठी गर्दी; घरांजवळ वाढवली गस्‍त

दैनिक गोमन्तक

Israel War Impact: इस्रायल आणि हमास यांच्‍यात सध्‍या युद्ध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पाळोळे येथील इस्रायली नागरिकांच्‍या प्रार्थनागृहाला (जबाड हाऊस) 24 तास पोलिस सुरक्षा पुरविण्‍यात आली आहे. यापूर्वीही तेथे पोलिस तैनात करण्यात येत होते, पण आता सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे.

संध्याकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत जबाड हाऊसमध्‍ये प्रार्थना करण्‍यात येते. त्याचप्रमाणे

शनिवारी सकाळी १० वाजता प्रार्थना सुरू होते. या प्रार्थना सभांना

मोठी गर्दी असते. त्यामुळेच पोलिस कुमक वाढविण्यात आली आहे. इस्रायली नागरिकांना वैयक्तिक

सुरक्षा पुरविणे सध्‍या तरी शक्य नाही. मात्र त्यांच्या निवासस्थानाबाहेर

पोलिस गस्‍त सुरू असते असे पोलिस निरीक्षक चंद्रकांत गावस यांनी सांगितले.

पाळोळे येथे एका खासगी इमारतीत इस्त्रायली नागरिकांची प्रार्थना चालते. यावेळी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी असलेले इस्त्रायली नागरिक आपल्या बायका-मुलांसह हजेरी लावतात.

युवक जाणार सैन्‍यात

युद्ध भडकल्याने इस्त्रायली नागरिकांच्‍या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. काही नागरिक युद्ध संपून शांतता प्रस्थापित झाल्यानंतर आपल्‍या मायदेशी जाण्यासाठी इच्‍छुक आहेत. पाळोळे येथे गेलेल्या पत्रकारांना धर्मगुरुंनी आपल्‍या प्रार्थनागृहात प्रवेश देण्यास असमर्थता दर्शविली. इस्त्रायल‌‌ देशाला सध्‍या युवकांची गरज आहे. तसे आवाहनही करण्यात आले आहे. त्यामुळे काही युवकांनी मायदेशी जाऊन सैन्यात रूजू होण्याचे ठरविले आहे, असे धर्मगुरूंनी सांगितले.

इस्रायलच्‍या प्रार्थनागृहाजवळ पोलिस कुमक वाढविण्यात आली आहे. त्‍या नागरिकांना वैयक्तिक सुरक्षा पुरविणे सध्‍या तरी शक्य नाही. मात्र त्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिस गस्‍त सुरू आहे.
- चंद्रकांत गावस, पोलिस निरीक्षक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT