Goa Mining: ‘बार्ज’ची तयारी नाहीच!

Goa Mining: खाणकाम सुरू झाले, खनिज वाहतूक सुरू झाली, तरी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या 20 दशलक्ष टन मर्यादेपैकी केवळ 10 दशलक्ष टन खनिजाचीच वाहतूक जलमार्गाने करता येणार आहे.
Barge is not ready!
Barge is not ready!Dainik Gomantak

अवित बगळे

Goa Mining: खाणकाम सुरू झाले, खनिज वाहतूक सुरू झाली, तरी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या २० दशलक्ष टन मर्यादेपैकी केवळ १० दशलक्ष टन खनिजाचीच वाहतूक जलमार्गाने करता येणार आहे.

Barge is not ready!
Goa Sports News: खेळाडूंची सुरक्षा आणि सुरक्षिततेवर भर

आवश्यक प्रमाणात बार्ज उपलब्ध नसल्याने अशी स्थिती उद्‍भवणार असल्याचे गोवा बार्ज मालक संघटनेचे अध्यक्ष अतुल जाधव यांनी ‘गोमन्तक’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. यंदा खाणकाम सुरू होण्याची शक्यता तशी धूसर दिसत असल्याची शक्‍यताही त्यांनी व्‍यक्त केली. त्यांच्याशी झालेली प्रश्नोत्तरे.

बार्ज व्यवसाय सध्या चर्चेत नाही. सद्यःस्थिती काय आहे?

खनिज वाहतूक कधी सुरू होणार याची आम्हा सर्वांना प्रतीक्षा आहे. थकीत कर्जे फेडण्याचे आव्हान आहे, यासोबत बार्ज दुरुस्तीचे असाध्य असे लक्ष्य आहे. आता आमच्या सभासदांच्या केवळ ६४ बार्ज शिल्लक आहेत. त्यांपैकी ४० बार्ज गोव्यात आहेत. खनिज निर्यातदारांच्या २२ बार्ज आहेत. त्यामुळे ४० बार्ज जरी उपलब्ध झाल्या तरी १० दशलक्ष टन खनिजाचीच वाहतूक करता येणार आहे. तीही करण्यासाठी मोठी गुंतवणूक बार्ज दुरुस्तीवर आम्हांला करावी लागेल. ती कुठून करावी हा प्रश्न आहे.

Barge is not ready!
Goa Accidental Death: पेट्रोलपंप कामगारांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात

नव्याने कर्ज मिळण्याचा मार्ग बंद झाला आहे तर?

बॅंकांनी आम्हांला उभे करून घेणेच बंद केले आहे. त्यापेक्षा वाईट बाब म्हणजे केंद्र सरकारच्या लघु उद्योगांसाठीच्या योजनेतून २ कोटी रुपयांचे कर्ज प्रत्येक बार्ज मालकाला मिळू शकत होते. आम्ही सारे लघू उद्योग योजनेखाली नोंद आहोत. सरकारच्या योजनेचा लाभ आम्हांला देण्यास बॅंकांनी सरळ नकार दिला आहे. विनातारण असे कर्ज या योजनेखाली १० टक्के व्याज दराने तर तारणासह ७-८ टक्के दराने ते मिळत होते. ती संधी आम्हांला न मिळाल्याने बार्ज दुरुस्तीसाठी घरावर, दागिन्यांवर, इतर मालमत्तेवर कर्ज घेण्याची वेळ आमच्यावर आली आहे.

Barge is not ready!
Working Lifestyle: नाईट शिफ्ट करताय सावधान! यामुळे तुम्ही होऊ शकता लठ्ठपणाचे शिकार....

असा किती खर्च एक बार्ज दुरुस्त करण्यासाठी येणार आहे?

एका बार्जच्या दुरुस्तीसाठी एक कोटी रुपये खर्च सर्वसाधारणपणे येतो. ज्या बार्जची दरवर्षी नियमितपणे देखभाल दुरुस्ती केली जाते, ती पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी किमान ५० लाख रुपये खर्च येतो. २ हजार टनी बार्जसाठी १ कोटी रुपये, तर ७५० ते १ हजार टनी बार्जसाठी ५० लाख रुपये खर्च ठरून गेलेला आहे. १ टनाच्या ७ तर ७५० टनाच्या ३ बार्ज दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातील ५-६ बार्ज तर यंदा दुरुस्त केल्या नाहीत तर गंजून जातील. त्यांना दुरुस्तीसाठी प्रत्येकी २ कोटी रुपयांहून जास्त खर्च येणार आहे.

बार्ज दुरुस्त झाल्या तरी त्या चालवण्यासाठी कर्मचारी तरी मिळणार काय?

तो त्याहून मोठा प्रश्न आहे. या प्रश्नात हस्तक्षेपासाठी आम्ही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बंदर कप्तानांसोबत बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे. सारंग या पदावर पोचण्यासाठी बार्जवरील कामाचा दीड वर्षाचा अनुभव कायद्यानुसार अनिवार्य आहे. गोव्यात बार्जवर १५ दिवस काम केले जाते व १५ दिवस सुट्टी घेतली जाते. त्यातही वर्षाचे ८-९ महिनेच काम असते. म्हणजे प्रत्यक्षात वर्षाला ४ महिनेच अनुभव अशी नोंद होते. या गतीने त्या पदावर पोचण्यासाठी ४ वर्षे काम करावे लागते. द्वितीय श्रेणी चालक पदासाठी ५ वर्षांचा अनुभव अनिवार्य आहे. तो मिळवण्यासाठी २० वर्षे काम करावे लागेल. तेवढी वर्ष काम केलेला गोव्यातील बार्जवर, तेही व्यवसाय बेभरवशाचा असताना काम का करेल. त्यामुळे यात सूट देण्याची गरज आहे.

कर्जावर हवी सवलत

सरकारी कारभाराबाबत सांगताना जाधव म्हणाले, बार्ज व्यावसायिकांच्या कर्जावरील व्याज माफ करण्याचा सरकारी आदेश आहे. एका सहकारी बॅंकेने याचा लाभ घेत एका व्यावसायिकाच्या मर्सिडीस व फोर्च्युनर कारच्या कर्जावरील व्याज माफ केले. असे प्रकार घडता कामा नयेत. व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावर सवलत दिली गेली पाहिजे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com