RTI Dainik Gomantak
गोवा

Right To Information: आरटीआय अंतर्गत मागितलेली माहिती न दिल्याने सचिवाला झाला इतका दंड

कायद्यात नमूद केलेल्या वेळ मर्यादेत माहिती देण्यास हलगर्जीपणा केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

Right To Information: माहिती अधिकार कायद्याखाली मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने शेल्डे पंचायतीचे सचिव रवींद्र वाडीकर यांना राज्य माहिती आयुक्तांनी दोन वेगवेगळ्या प्रकरणात एकूण 12 हजार रुपये दंड ठोठावला.

राज्य माहिती आयुक्त संजय ढवळीकर यांनी हा आदेश दिला. कायद्यात नमूद केलेल्या वेळ मर्यादेत माहिती देण्यास हलगर्जीपणा केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे. सोनफातर शेल्डे येथील अनिल सावंत देसाई यांनी शेल्डे पंचायतीकडून माहिती मागणारे दोन अर्जं सादर केले होते.

मात्र प्राथमिक माहिती अधिकारी असलेले वाडीकर यांनी ही माहिती त्यांना दिली नाही. यावर त्यांनी वरिष्ठ माहिती अधिकारी असलेल्या भाग विकास अधिकाऱ्यांकडे अपील दाखल केल्यावर ही माहिती देण्यात यावी, असा आदेश देऊनही वाडीकर यांनी ती माहिती दिली नाही.

त्यामुळे देसाई यांनी राज्य आयुक्तांकडे दाद मागितली असता त्यांनी वरील आदेश दिला.

ही दंडाची रक्कम दोन हप्त्यात वाडीकर यांच्या पगारातून वजा करून सरकारी तिजोरीत ते जमा करावे, असे या आदेशात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

LPG Gas Cylinder: व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडाच! दुप्पट दर मोजण्याची वेळ; नागरी पुरवठा खात्याने लक्ष देण्याची गरज

वीज वितरणात गोव्याची उत्तुंग झेप! देशात 11वे स्थान; ‘डिस्ट्रिब्युशन युटिलिटीज रँकिंग’मध्‍ये तिसरा क्रमांक

Sal River: साळ नदीप्रश्‍नी काँग्रेस आक्रमक! आमदारांच्या भूमिकेवर जोरदार टीका; कायमस्वरूपी तोडग्याची केली मागणी

Lairai Jatra: श्री लईराई जत्रोत्‍सवाच्‍या तयारीला वेग! आमदारांकडून आढावा; 10 एप्रिलपर्यंत सर्व उपाययोजना पूर्ण करण्याचे निर्देश

'मिस यू डॅडी'...लिहून संपवले जीवन! गोव्याच्या मुलीचा कोल्हापुरात दुर्दैवी अंत; कारण अस्पष्ट

SCROLL FOR NEXT