scrap depot fire Goa Dainik Gomantak
गोवा

Zuarinagar Fire: 10 दिवसांत दुसऱ्यांदा 'भडका'! भल्या पहाटे अवैध भंगार डेपोला आग; बिर्ला-झुआरीनगरमध्ये संशयाचे वातावरण

Sancoale fire incident: अवघ्या १० दिवसांपूर्वी अशीच आग लागली असल्याने या घटनेमागे काहीतरी संशयास्पद कारण असावे अशी शक्यता

Akshata Chhatre

झुआरीनगर: गोव्यातील सांकवाळ परिसरातील बिर्ला-झुआरीनगर येथे असलेल्या एका अवैध भंगार डेपोला रविवार (दि.३०) पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी अवघ्या १० दिवसांपूर्वी अशीच आग लागली होती, ज्यामुळे या घटनेमागे काहीतरी संशयास्पद कारण असावे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही आग पहाटे सुमारे २ वाजून २३ मिनिटांनी लागल्याचे वृत्त आहे.

दाट धुरामुळे दृश्यमानतेवर परिणाम

पहाटेच्या वेळी लागलेल्या या आगीमुळे परिसरात दाट काळ्या धुराचे साम्राज्य पसरले होते. या धुरामुळे रस्त्यांवर आणि आसपासच्या भागांमध्ये दृश्यमानता कमालीची खालावली होती, ज्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना मदत कार्यात अडथळे आले. भंगार डेपोमध्ये प्लास्टिक, रबर आणि इतर ज्वलनशील वस्तू असल्याने आगीने त्वरित उग्र रूप धारण केले.

अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न

आगीची माहिती मिळताच वास्को अग्निशमन दलाचे प्रभारी दिलीप बिचोलकर यांनी तातडीने पथके घटनास्थळी रवाना केली. आगीची तीव्रता पाहून त्यांनी लगेच पणजी कंट्रोल रूमद्वारे अधिक कुमक मागवली.

वास्को, पणजी, वर्णा येथील अग्निशमन पथकांसह गोवा शिपयार्ड आणि एमपिटी येथील दलाचे जवानही मदतीसाठी पोहोचले. वाढत्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नंतर फोंडा आणि मडगाव येथील पथकांनाही पाचारण करावे लागले. अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही भीषण आग नियंत्रणात आणण्यात यश आले.

संशयाची सुई 'जाणूनबुजून आग' लावण्यावर

या आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जाणूनबुजून आग लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. १० दिवसांत एकाच ठिकाणी दोन वेळा मोठी आग लागल्यामुळे हा भंगार डेपो आणि त्यामागील कारणे आता प्रशासनाच्या रडारवर आली आहेत. वास्को पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला असून, आगीच्या नेमक्या कारणांचा आणि अवैध भंगार डेपोच्या मालकीचा तपास सुरू केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panchank Rajyog 2026: धनु राशीत मंगल-वरुणचा मिलाफ! 'पंचांक योग' उजळवणार 'या' 3 राशींचं नशीब; 7 जानेवारीपासून सुवर्णकाळ

"उद्या भारतासोबतही असं घडू शकतं..."; निकोलस मादुरोंच्या अपहरण प्रकरणावर काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य; सोशल मीडियावर पेटला वाद VIDEO

Kartik Aaryan: गोव्यातील सुट्ट्या अन् आता स्नॅपचॅट वाद! कार्तिक आर्यनच्या 'त्या' व्हायरल स्क्रीनशॉटने खळबळ; काय नेमकं प्रकरण?

मोपा विमानतळावरील वाहन प्रवेश शुल्कावरून 'GMR'ला शो-कॉज नोटीस; 7 दिवसांत मागितला खुलासा

Arpora Nightclub Fire: "सरपंचाला का बनवताय बळीचा बकरा?" बिर्च बाय रोमिओ दुर्घटनेबाबत सरदेसाईंचा रोखठोक सवाल; विधानसभेत उठवणार आवाज

SCROLL FOR NEXT