Goa IIT  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात ‘आयआयटी’साठी नव्या जागेचा शोध सुरू

काणकोण, सांगेसह 3 जागांची पाहणी: 10 हजार चौरस मीटर जागेची आवश्यकता

दैनिक गोमन्तक

अनिल पाटील

पणजी: सत्तरीतील जागेच्या वादावरून चर्चेत राहिलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-गोवा अर्थात आयआयटीसाठीच्या नव्या जागेचा शोध सुरू झाला असून पुन्हा काणकोण, सांगेसह 3 जागांची पाहणी केली आहे. लवकरच त्याचा तपशील केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाला पाठवला जाईल, अशी माहिती शिक्षण सचिव रवी धवन यांनी दिली. केंद्र सरकारला ‘आयआयटी’सह गोव्याला शैक्षणिक हब बनवायची इच्छा असून केंद्र सरकार त्या पद्धतीने विचार करत आहे, असेही धवन यावेळी म्हणाले.

मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीमध्ये आयआयटीच्या जागेसंदर्भात चर्चा झाली. यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आग्रही असून केंद्र सरकारला गोवा शैक्षणिक हब बनवण्याची इच्छा असून यासाठी देशाची एकमेव फॉरेन्सिक युनिव्हर्सिटी, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कायद्यासंबंधीचे अरबीट्रेशन संशोधन केंद्र उभारणीसाठी सुरवात झाली आहे.

फिल्म मेकिंग अभ्यासक्रम

राज्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कायमस्वरूपी स्थिरावल्याने फिल्म मेकिंगबरोबर या क्षेत्रातल्या नव्या तंत्रज्ञानाच्या उपयोगासंबंधीचे अभ्यासक्रम गोवा विद्यापीठात सुरू करण्यात येणार आहेत. याला यूजीसी आणि राज्य सरकारकडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून यासंदर्भातील अभ्यासक्रम सुरू होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT