Colvale Fire Dainik Gomantak
गोवा

Colvale Fire : वेल्डिंगच्या ठिणगीमुळे अग्नितांडव; कोलवाळ परिसरात स्क्रॅपयार्डला आग

बिनानी परिसरात मुशीर वाडा येथे आग लागल्याने धुराचे लोट परिसरात पसरले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

कोलवाळ परिसरात स्क्रॅपयार्डला आग लागल्याची घटना घडली आहे. बिनानी परिसरात मुशीर वाडा येथे आग लागल्याने धुराचे लोट परिसरात पसरले होते. बुधवारी सकाळी अचानक या स्क्रॅपयार्डला आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. एकाचवेळी दोन स्क्रॅपयार्डना आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान या आगीत शेजारीच असलेलं दुसरं स्क्रापयार्डही आगीच्या विळख्यात सापडलं आहे. स्क्रॅपयार्डमधील कामगार वेल्डिंग करत असताना त्याची ठिणगी पडून आग लागली असून या आगीने रौद्ररुप धारण केलं आहे. अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच तातडीने गाड्या रवाना करण्यात आल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे.

मुशीरवाडा कोलवाळ भागात असलेला हा भंगार अड्डा रिझवान अहमद यांच्या मालकीचा असल्याची माहिती आहे. या भंगारअड्ड्यावर याआधीच कारवाई करत पालिकेनं तो हटवला होता. मात्र हा अड्डा पुन्हा थाटण्यात आला होता. या भंगारअड्ड्याला लागलेल्या आगीत आजूबाजूचे अड्डेही आल्याने आगीने रौद्ररुप धारण केलं. या आगीत दोघेजण जखमी झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT