Scorpio jeep accident Tambose Dainik Gomantak
गोवा

VIDEO: दोन कोलांट्या घेत जीप महामार्गाबाहेर... तांबोसेत भीषण अपघात; निपाणीतील पाच जखमी

Scorpio jeep accident Tambose: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील तांबोसे येथील पूल व कपेलदरम्यानच्या वळणावर रविवारी संध्याकाळी ६.१५च्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने स्कॉर्पिओ जीप महामार्ग सोडून दोन कोलांट्या घेत सुमारे दहा ते पंधरा मीटर अंतरावर जाऊन स्थिरावली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पेडणे: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील तांबोसे येथील पूल व कपेलदरम्यानच्या वळणावर रविवारी संध्याकाळी ६.१५च्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने स्कॉर्पिओ जीप महामार्ग सोडून दोन कोलांट्या घेत सुमारे दहा ते पंधरा मीटर अंतरावर जाऊन स्थिरावली.

या अपघातात जीपमधील निपाणी-कर्नाटक येथील पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने तुये येथील सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. स्थानिकांनी जीपमधील प्रवाशांना बाहेर काढले. उपनिरीक्षक तुकाराम चोडणकर तपास करीत आहेत.

सहल अटपून निघाले होते गावी...

निपाणीतील पाच युवक गोव्यात सहलीसाठी आले होते. रविवारी केए ४९, एन २००५ या क्रमांकाच्या स्कॉर्पिओ जीपने ते गावी परतत होते. तांबोसे येथे पोहोचले असता, वळणावर चालकाचा ताबा गेल्याने जीप दोन कोलांट्या घेत सुमारे दहा मीटर अंतरावर जाऊन स्थिरावली. त्यातील पाच युवक गंभीर जखमी झाले. रोशन लाड, प्रथम चंदुरकर, प्रथमेश माणसुळे, प्रतीक गोविलकर व वीरेश अंकुशे अशी त्यांची नावे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT