SCO Meet In Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात उद्यापासून SCO बैठक; 'या' देशांचे परराष्ट्र मंत्री राहणार उपस्थित, भारत-पाकिस्तान चर्चेकडे लक्ष

शांघाय कॉपरेटिव्ह ऑर्गनायझेशन ही युरेशियन राजकीय, आर्थिक, आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण संस्था आहे.

Pramod Yadav

SCO Meet In Goa: गोव्यात उद्यापासून (गुरूवार, दि.04) शांघाय सहकार्य संघटनेची परिषद सुरू होणार आहे. या परिषदेत चीन, पाकीस्तान, रशियासह इतर सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री 4 आणि 5 मे रोजी गोव्यातील बैठकीला उपस्थित राहतील.

शांघाय कॉपरेटिव्ह ऑर्गनायझेशन ही युरेशियन राजकीय, आर्थिक, आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण संस्था आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने 2 मे रोजी परराष्ट्र मंत्री किन गँग यांच्या गोवा दौर्‍याची अधिकृत माहिती दिली. किन गँग दोन महिन्यांनी पुन्हा भारत दौऱ्यावर येत आहेत. यापूर्वी ते जी -20 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी नवी दिल्लीत आले होते. यावेळी त्यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली होती.

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जी लावरोव गोव्यातील बैठकीला उपस्थित राहतील असे रशियन परराष्ट्र मंत्रालयाने गेल्या आठवड्यात जाहीर केले होते. यावेळी ते एससीओच्या आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक विषयावर चर्चा करतील असे मॉस्कोमध्ये जारी केलेल्या एक प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

"राज्य परिषद सदस्य आणि परराष्ट्र मंत्री किन गँग इतर SCO सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक परिस्थिती आणि विविध क्षेत्रांतील SCO सहकार्य, अशा विषयांवर चर्चा करतील." असे बीजिंगमधील चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर देखील बैठकीला उपस्थिती लावतील. यावेळी प्रामुख्याने पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री यांच्याशी होणाऱ्या चर्चेकडे सर्वांचे लक्ष असेल.

दरम्यान, येत्या जुलैमध्ये चीन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष देखील भारत भेटीवर येणार आहेत. या भेटीच्या पूर्वी आता होणारी बैठक महत्वाची मानली जात आहे.

चीन आणि रशियाच्या नेतृत्वाखालील युरेशियन सुरक्षा गटामध्ये कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या चार मध्य आशियाई राष्ट्रांचाही समावेश आहे, तर भारत आणि पाकिस्तान 2017 मध्ये या गटात सामील झाले आहेत. इराण आणि बेलारूस या देशांचा देखील यात समावेश होणार असल्याचे सांगितले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT