SCO Summit 2023 In Goa dainik gomantak
गोवा

SCO Summit Goa 2023: झक्कास! पाक, चीन, रशियासह SCO देशांचे मंत्री पडले गोव्याच्या खाद्यपदार्थ, संस्कृतीच्या प्रेमात

गोव्यातील बाणावली समुद्रकिनारी 04 आणि 05 मे रोजी ही बैठक पार पडली.

Pramod Yadav

SCO Summit 2023 In Goa: गोव्यात पार पडलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत चीन, रशिया, पाकिस्तानसह विविध देशांचे परराष्ट्र मंत्री उपस्थित होते.

गोव्यातील बाणावली समुद्रकिनारी 04 आणि 05 मे रोजी ही बैठक पार पडली. या बैठकीला हजेरी लावलेल्या मंत्री, प्रतिनिधींना गोव्यातील खाद्यपदार्थ, संस्कृतीने भुरळ पाडली.

SCO देशांचे सर्व प्रतिनिधी गोव्यातील पाककृती, संस्कृती आणि आदरातिथ्य पाहून प्रभावित झाले, असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी रविवारी सांगितले.

दरवर्षी होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीचे अध्यक्षपद यावर्षी भारताकडे आहे. गोव्यात झालेल्या या बैठकीला रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गी लावरोव, चीनचे किन गँग, पाकिस्तानचे बिलावल भुत्तो-झरदारी, उझबेकिस्तानचे बख्तियोर सैदोव आणि एससीओचे सरचिटणीस झांग मिंग उपस्थित होते.

याशिवाय ताजिकिस्तानचे परराष्ट्रमंत्री सिरोजिद्दीन मुहरिद्दीन, कझाकिस्तानचे मुरात नुरटलेउ आणि किर्गिस्तानचे झीनबेक कुलुबाएव हेही या बैठकीला उपस्थित होते.

"SCO परराष्ट्र मंत्र्यांची गोव्यात मे 04-05, 2023 रोजी बैठक झाली. सर्व प्रतिनिधी गोव्यातील खाद्यपदार्थ , संस्कृती आणि आदरातिथ्य पाहून प्रभावित झाले," असे जयशंकर यांनी ट्विट केले.

"बैठकीसाठी उत्कृष्ट व्यवस्था केल्याबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि सर्व अधिकाऱ्यांचे आभार," असे जयशंकर म्हणाले.

गोव्यात पार पडलेल्या या बैठकीत SCO सदस्य देशांचे परराष्ट्रमंत्री यांच्यात विविध मुद्यांवर चर्चा झाली. यात प्रामुख्याने दहशतवाद आणि आर्थिक संबंधावर चर्चा झाली. भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांनी सीमापार दहशतवादासह सर्वप्रकारच्या दहशतवादाला आळा घालण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. तर, पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय चर्चेसाठी पोषक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी भारताची असल्याचे मत एका मुलाखतीत व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT