School Student Push Kadmba bus  Dainik Gomantak
गोवा

Kadamba Bus Services: चिखलात रुतलेल्या कदंब बसला विद्यार्थ्यांचा दे धक्का! जांबावलीतील प्रकार

घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल

गोमन्तक डिजिटल टीम

Zambaulim : राज्यातील माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना ने-आण करण्याचे काम कदंब वाहतूक महामंडळ करीत आहे. पण याच विद्यार्थांवर कदंबची बस ढकलण्याची वेळ आली. हा प्रकार शनिवारी दक्षिण गोव्यातील जांबावली याठिकाणी घडलेला आहे.. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

श्री रामनाथ दामोदर महाराज की जय' जयघोष करत विद्यार्थ्यी चिखलात रुतलेली बस ढकलतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. जांबावलीतील विद्यार्थ्यांना ने-आण करण्याचे काम कदंब बसमार्फत करण्यात येते.

शाळेच्या समोर जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु असून खोदकाम करुन माती टाकण्यात आलेली आहे व रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. शनिवारी मुलांना नेण्यासाठी आलेल्या कदंब बस अडकून बसली. बसचे चाक रस्त्यावरील चिखलमय खड्ड्यात रुतले.

बस खड्ड्यातून पुढे बाहेरच येत नसल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांना बसला धक्का देण्याची वेळ आली. या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

अशी होते वाहतूक

महामंडळाकडे डिझेलवर चालविण्यात येणाऱ्या 500 बसेस आहेत. त्यातील दररोज म्हणजे आठवड्यातील सहा दिवस 200 बसेस सकाळी ते दुपारी शाळा सुटेपर्यंत व्यस्त असतात.

शाळांच्या मुलांना ने-आण करण्याबरोबर मधल्या काळात सरकारी कर्मचारी पोहोचविण्याचे कामही या बसेसना पार पाडावे लागते. दुपारी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी घरी पोहोचल्यानंतर या बसेस पुन्हा प्रवाशी सेवेत रुजू होतात, असा सर्व खेळ महामंडळाला पार पाडावा लागतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT