Student assault case  Dainik Gomantak
गोवा

Student Assault Case : विद्यार्थिनी मारहाण प्रकरणाचा पोलिसच आधी तपास करतील! शिक्षण संचालक झिंगडे

गोमन्तक डिजिटल टीम

Student Assault Case : पणजी, साखळी येथील शाळेतील विद्यार्थिनीस मारहाण प्रकरणी तपास पोलिसच करतील. पोलिसांत तक्रार करण्यात आल्याने शिक्षण खात्याने आधी चौकशी करण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी घेतली आहे.

त्या शिक्षिकेने त्या विद्यार्थिनीस मारहाण केली नसल्याचे शिक्षक आणि पालक शिक्षक संघाचे म्हणणे आहे. त्यामुळे शिक्षण खाते आता काय करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या संदर्भात झिंगडे यांना विचारले असता ते म्हणाले, आता हे प्रकरण पोलिसांत पोचले आहे.

त्यामुळे पोलिसच या प्रकरणी तपास करून नेमका मारहाणीचा प्रकार घडला आहे किंवा नाही याचा निष्कर्ष काढतील. त्यांच्या तपासात शिक्षिकेने मारहाण केली असल्याचे निष्पन्न झाल्यास पुढील कारवाई शिक्षण खाते करणार आहे.

तूर्त पोलिस तपासात शिक्षण खाते हस्तक्षेप करणार नाही. एकाच घटनेचे एकाचवेळी दोन यंत्रणांकडून तपास केला जाऊ शकत नाही. पोलिस तपासात कोणती माहिती समोर येते, त्यावरून पुढे काय करायचे याचा निर्णय शिक्षण खाते घेणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: अट्टल गुन्हेगार मारियासह दोघेजण गजाआड! पर्वरी पोलिसांची धडक कारवाई; संशयितांना 6 दिवसांची कोठडी

CM Pramod Sawant: 'गोव्यातील धार्मिक आणि सामाजिक सलोखा बिघडवाल तर याद राखा...'; मुख्यमंत्र्यांनी भरला सज्जड दम!

Logistics Park in Goa: गोव्यातील पहिल्या ‘लॉजिस्टिक पार्क’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; गोमंतकीयांच्या फायद्यासाठी...

'हे देवा वेलिंगकरांना माफ कर, त्यांना माहिती नाही ते काय बोलले', मायकल लोबोंची Xavier चरणी प्रार्थना

Goa Today's News Live: मांडवी आणि झुआरी नद्यांमधील वाळू उत्खननाला मंजुरी!

SCROLL FOR NEXT