Vishwajit Rane|Goa News Dainik Gomantak
गोवा

Vishwajit Rane: प्रादेशिक विकास आराखड्यात कोटींचा घोटाळा- राणे

दोषींवर कारवाई करू : संपूर्ण प्रकरण विधानसभेत मांडणार

गोमन्तक डिजिटल टीम

Vishwajit Rane प्रादेशिक विकास आराखडा 2021 हा महाघोटाळाच असून एका एका प्रकरणामध्ये 500 कोटींहून अधिक रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा अंदाज आहे. यावरून हा महाघोटाळा किती कोटींचा असू शकतो, याचा अंदाज येईल.

हे लोकांसमोर मांडण्यासाठीच या संपूर्ण आराखड्याचा तपशील येत्या विधानसभेत मांडणार असल्याची माहिती नगर नियोजन व नगर विकास मंत्री विश्वजीत राणे यांनी बुधवारी ‘ट्विट’ करून दिली.

मंत्री राणे यांनी ‘ट्विट’ करत या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. मुख्य नगर नियोजक जेम्स मॅथ्यूज आणि शहर नियोजक विनोद कुमार यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर या आराखड्यात अनेक बेकायदा गोष्टी घुसडल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्य स्तरावरील समितीने स्वाक्षरी केलेल्या अनेक योजना आपण पाहिल्या आहेत. यात काही सदस्यांच्या स्वत:च्या व्यावसायिक फायद्यासाठी मालमत्तेचे झोन बेदरकारपणे सेटलमेंट झोनमध्ये बदलले आहेत.

आजोशी गावात 3 लाख चौमी जंगलाचा भाग काढून त्याचे सेटलमेंटमध्ये रूपांतर केले आहे. त्याचे मूल्यमापन केल्यास 500 कोटी रुपयांहून अधिकचा हा घोटाळा आहे. विशेष म्हणजे, या सर्व भागांचे सीमांकन केले असून खासगी वनक्षेत्रे अन्य बिल्डर्सनी विकत घेतले आहेत.

त्यामुळे हा महाघोटाळाच आहे. हडफडे, आजोशी, अस्नोडा या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात सेटलमेंट दाखवली असून खासगी जंगलांचा भाग रिसॉर्टमध्ये रूपांतरित केला आहे.

ही तर जनतेची फसवणूक

‘आरपी-21’मध्ये अनेक बाबी बेकायदेशीरपणे केल्या आहेत. हा महाघोटाळा होता, हे जनतेला कळावे, अशी अपेक्षा आहे. नगर नियोजकांची कोणतीही पात्रता नसलेल्या राज्यस्तरावरील समितीने जनतेची फसवणूक केली असून केवळ स्वार्थासाठी बेकायदेशीर गोष्टींना थारा दिला आहे. यासाठी मी तज्ज्ञ समितीकडून संपूर्ण व्यवहाराची चौकशी करणार आहे, असे विश्‍वजीत राणे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Passport Fee Hike: परदेश प्रवास करणाऱ्यांना मोठा झटका! 1 जुलैपासून पासपोर्ट शुल्कात वाढ; अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर

Goa Yellow Alert: धुवांधार पाऊस अन् सोसाट्याचा वारा! गोव्यात पावसाची जोरदार बॅटिंग; पुढील 5 दिवस 'यलो अलर्ट'

Goa Crime: जाब विचारण्याची किंमत जीवाने! चिखली-कोलवाळ येथे मद्यधुंद युवकांकडून खून; नातेवाईकांनाही बेदम मारहाण

NCERT चा मोठा निर्णय! 9 वीच्या पुस्तकात आता 'आणीबाणी'ची एन्ट्री; पहिल्यांदाच विद्यार्थी शिकणार 1975 चा इतिहास

Goa Tourism Projects: 'टाऊन स्क्वेअर'ची मंत्र्यांकडून पाहणी, पर्यटन विकासासाठी केंद्राच्या सहकार्याची ग्वाही

SCROLL FOR NEXT