Savoi Verem  Dainik Gomantak
गोवा

Savoi Verem : निशानने धाग्यातून टिपला ‘द ग्लो ऑफ आई लईराई’;सावईवेरेतील युवा कलाकाराची कलाकृती

Savoi Verem : सावईवेरे येथील निशान मंगलदास पालकर (२२) याने धाग्यापासून लईराई देवीची प्रतिकृती साकारली आहे. ''द ग्लो ऑफ आई लईराई'' असे नाव या कलाकृतीला दिले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Savoi Verem :

सावईवेरे, कलाकार नेहमीच काही तरी नावीन्यपूर्ण करण्यासाठी धडपडत असतात. आपल्या कलेत वेगळेपणा आणून आत्मिक समाधान मिळावे यासाठी ते प्रयत्नशील असतात.

सावईवेरे येथील निशान मंगलदास पालकर (२२) याने धाग्यापासून लईराई देवीची प्रतिकृती साकारली आहे. ''द ग्लो ऑफ आई लईराई'' असे नाव या कलाकृतीला दिले आहे.

निशान हा गोवा कॉलेज ऑफ आर्टचा विद्यार्थी असून उभरता कलाकार म्हणून त्याची परिसरात ओळख आहे. ही कलाकृती साकार करण्यासाठी त्याला सात दिवस लागले, असे त्याने सांगितले.

‘थ्रेड आर्ट’ संबंधी...

‘थ्रेड आर्ट’ संबंधी निशान याने सांगितले की, ही धाग्यापासून साकारली जाणारी कलाकृती आहे. सर्वप्रथम प्लायवूडवर खिळे ठोकावे लागतात. प्लायवूडवर खिळ्यांच्या साहाय्याने मार्किंग केले जाते. जो आकार काढायचा आहे, त्यानुसार खिळ्यांचे मार्किंग करणे आवश्यक असते. मग धागे सरळ रेषेत गुंडाळावे लागतात.

२६४ खिळ्यांचा वापर:

लईराई देवीची प्रतिमा साकारताना प्लायवूडवर एकूण २६४ खिळे वर्तुळाकार ठोकून काळ्या धाग्यांचा वापर केला आहे. या धाग्यांच्या आडव्या, उभ्या, तिरप्या अशा सुमारे ४ हजार रेषा आखून प्रथमच लईराई देवीची प्रतिकृती साकारली असल्याचे निशान याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पेडणे स्मशानभूमीत अज्ञाताचा कुजलेला मृतदेह! 4-5 दिवसांपूर्वी आणून ठेवल्याचा संशय; खुनाच्या शक्यतेने चतुर्थीत खळबळ

Goa Protests: गोव्यात पाच वर्षांत 42 आंदोलने; 2025 मध्ये सर्वाधिक 15! आंदोलनांशी संबंधित गुन्ह्यांत 2024 आघाडीवर, 7 एफआयआर दाखल

VIDEO: हवेतच विमानाचं टायर फुटलं, इंजिनमध्ये घुसले रबराचे तुकडे अन्..., इराणमध्ये बोइंग 737 चं थरारक इमर्जन्सी लँडिंग; व्हिडिओ व्हायरल

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' भाजपचेच प्यादे? चोडणकरांचा उपरोधिक टोला; 'आप'-भाजपमध्ये पंजाब-गोवा 'एक्सचेंज ऑफर' असल्याचा दावा

खरी कुजबुज: विकास नेमका कोणासाठी?

SCROLL FOR NEXT