Savoi Verem Dainik Gomantak
गोवा

Savoi Verem : गावचे हरवलेले गावपण टिकवणे गरजेचे : रमेश तवडकर

गोमन्तक डिजिटल टीम

सावईवेरे, पूर्वी प्रत्येकजण गावातील रूढी ,परंपरा व गावपण टिकवून ठेवण्यासाठी कोणत्याही धनाची अपेक्षा न ठेवता गावच्या भल्यासाठी कार्यरत असायचे. परंतु आज २१ व्या शतकात माणुसकी व गावपण हरवलेले आहे.

गाव व गावचे गावपण जपणे अत्यंत महत्त्वाचे असून आपल्या गावासाठी थोडा वेळ दिल्यास विविधतेत एकता हे देशाचे तत्व टिकेल,असे प्रतिपादन सभापती डॉ.रमेश तवडकर यांनी केले.

बलराम चॅरिटेबल फाऊंडेशन व मित्रमंडळ प्रियोळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रियोळ मतदारसंघातील दहावी , बारावीच्या परीक्षेतील व क्रीडा क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच माध्यमिक स्तरावरील उत्कृष्ट शिक्षकांचा सन्मान सोहळा सावईवेरे येथील श्री मदनंत देवस्थानच्या सभागृहात उत्साहात झाला.त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. तवडकर बोलत होते.

यावेळी निवृत्त वायुसेना अधिकारी भालचंद्र आमोणकर, कुर्टी जिल्हा पंचायत सदस्या प्रिया चारी, केरीच्या सरपंच तृप्ती नाईक,बलराम चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकर्ते संतोष लोलयेकर , प्रकाश सतरकर उपस्थित होते.

गौरव सोहळा

यावेळी मैथिली देसाई ( स्वस्तिक विद्यालय, प्रियोळ) , दीपक हजारे ( महानंदू, भोम), शीतल फडते ( सावईवेरे), मोक्षदा गावडे (शिक्षा सदन), स्वरूपा उपाध्ये (शारदा इंग्लिश), नारायणी तेंडुलकर (केरकर, केरी), मिथाशा ऐगल ( वागळे), शांतेश वेरेकर (केआरएसएस) , मनोज कारापूरकर (विद्यालय, खांडोळा) व श्रीरंग जांभळे (रायकर कृषी, सावईवेरे) अशा दहा शिक्षकांचा सन्मान झाला. ३९ विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Social Media: ‘या’ 10 देशांतील लोक सोशल मीडियावर घालवतात सर्वाधिक वेळ; जाणून घ्या भारताचं स्टेटस

Margao News: ६८५ फाईल्सचे पुनरावलोकन, ९४ प्रकरणे प्रमाणित; ‘मेगा म्युटेशन’मधून १०० पेक्षा जास्त प्रकरणे निकाली

गोव्यात येणार 'डच' संशोधक! डेल्टारस कंपनीसोबत करार; किनाऱ्यांची धूप होण्यामागची शोधणार कारणे

..माझे नाव घेतल्याशिवाय काहीजणांना झोप येत नाही! 'Bhutani Project' आरोपांवर गुदिन्होंचे उत्तर

Saint Estevam Accident: सांतइस्तेव्‍ह प्रकरण! दुर्घटना की चित्रपटाची कथा? अनेक अनुत्तरीत प्रश्‍‍न

SCROLL FOR NEXT