Savoi Verem Dainik Gomantak
गोवा

Savoi Verem : सावईवेरेत भजनी सप्ताह उत्साहात

Savoi Verem: या मिरवणुकीत बालगोपाळांसह महिला तसेच ज्येष्ठ मंडळींचाही सहभाग होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Savoi Verem:  सावईवेरे जय विठ्ठल हरी विठ्ठल, जयजयकार जयजयकार श्री सातेरी देवीचा जयजयकार अशा श्री सातेरी व विठ्ठलाच्या जयघोषात तसेच टाळ - मृदंगाच्या निनादात सावईवेरे येथील श्री शांतादुर्गा देवस्थानचा अखंड नामस्मरण सार्वजनिक भजनी सप्ताह उत्साहात संपन्न झाला.

या सप्ताहानिमित्त श्री अनंत देवस्थान ते श्री सातेरी देवस्थानपर्यंत काढण्यात आलेल्या दिंडी मिरवणूकीस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मिरवणुकीत बालगोपाळांसह महिला तसेच ज्येष्ठ मंडळींचाही सहभाग होता.

श्री अनंत देवस्थान ते श्री सातेरी देवस्थानपर्यंत चित्ररथासह भव्य मिरवणूक काढण्यात आली. यानिमित्त वाड्या - वाड्यावरील भजनी बैठ्या पारांचे आयोजन करण्यात आले. संत तुकारामाच्या तैलचित्रासह दिंडी मिरवणूक काढण्यात आली. दुपारी देवस्थानात आरत्या, तीर्थप्रसाद व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला अन् सप्ताहाची सांगता झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT