Save Mahdei, Save Tiger: 'सेव्ह म्हादई, सेव्ह टायगर' बाईक रॅलीला आज (शुक्रवारी) चिखली येथून सुरुवात झाली. पर्यावरणप्रेमी फादर बोलमॅक्स परेरा यांनी या बाइक रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी समाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी तसेच राजाच्या विविध भागातील कार्यकर्ते व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
दक्षिण गोवा मोटारसायकल रॅलीची सुरुवात चिखली चर्च ग्राऊंडपासून झाली.
बाईक रॅलीत वास्को, चिखली, बोगमाळो, कासावली, वेळसाव, माजोर्डा, केळशी, नागोवा, वेर्णा आणि कुठ्ठाळी येथील नागरिक सहभागी झाले.
बाईक रॅली केवळ म्हादई आणि वाघ यांच्या बचावासाठी नसून मानव जातीला वाचवण्यासाठी आहे. गोव्यातील नद्यांसह नदी राष्ट्रीयकरण प्रकल्पावर माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी स्वाक्षरी केली होती. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणासाठी त्यांना दोषी धरावे. आपण म्हादई वाचवली नाही तर मानवही वाचणार नाही. असे यावेळी बोलमॅक्स परेरा म्हणाले.
म्हादई नदी वाचवणे आपली जबाबदारी आहे. तिची काळजी आपण घेतली नाही तर कोणी घेणार नाही. मंत्री माविन गुदिन्हो केंद्रातील लोक मदतीला येतील असा दावा करत आहेत पण, आम्ही केंद्राचे किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुलाम नाही. असे परेरा म्हणाले.
बाइक रॅली किंवा छोट्या कार्यक्रमांद्वारे म्हादई बचावासाठी जनजागृती कार्यक्रम करण्यासाठी आपले प्रयत्न आवश्यक आहेत. म्हादई गोव्यात सर्वत्र पोहोचते, त्यामुळे म्हादईसाठी सर्वांनी पुढे यायला हवे. असे आवाहन परेरा यांनी केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.