Save Mahadayi Save Goa delegation Meet Governor Pillai Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: 'सेव्ह म्हादई सेव्ह गोवा' फ्रंटच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

ओपिनियन पोलच्या दिवशी सेव्ह म्हादई सेव्ह गोवाच्या वतीने स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली होती

गोमन्तक डिजिटल टीम

Mahadayi Water Dispute: सेव्ह म्हादई सेव्ह गोवा फ्रंटच्या शिष्टमंडळाने गोव्याचे राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांच्याकडे म्हादईसंबंधी एक निवेदन सादर केले आहे. राजभवन येथे आज सकाळी भेट घेण्यात आली. तसेच म्हादईच्या विषयांवर शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा केली.

ओपिनियन पोलच्या दिवशी सेव्ह म्हादई सेव्ह गोवाच्या वतीने स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली होती. यावेळी डीपीआर तात्काळ मागे घेण्यासंबंधीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. व्ह म्हादई सेव्ह गोवाच्या फ्रंटच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांना ठराव सादर केला.

गोवा सरकारने तसेच केंद्र सरकारने म्हादईप्रश्नी कोणती प्रक्रिया केली पाहिजे यासंबंधीतील म्हादईच्या विषयांवर शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा केली. तसेच म्हादईप्रश्नी गोवा सरकार हवे तसे प्रयत्न करत नसल्याची खंत त्यांनी यावेळी राज्यपालांसमोर बोलून दाखवली.

म्हादई ही गोव्याची लाईफलाईन आहे त्यामुळे राज्यपालांनी सरकारला म्हादईप्रश्नी मार्गदर्शन करावे अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

यावेळी राज्यपालांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले असून ते संबंधित अधिकाऱ्यांकडे हे प्रकरण मांडून गोवावासीयांच्या भावना पोहोचवणार असल्याचे सेव्ह म्हादई सेव्ह गोवा फ्रंटचे नेते प्रशांत नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT