Sattari Dainik Gomantak
गोवा

Sattari News : सत्तरी तालुक्यात पारंपरिक शिमगोत्सव सुरू; कोपार्डेत होळी उत्साहात

Sattari News : पारंपरिक पद्धतीने काही ठिकाणी घराघरांत चोर फिरण्याची पद्धत आहे. आज सकाळी, सत्तरीच्या ग्रामीण भागात बहुतेक ठिकाणी सकाळच्या वेळी चोरोत्सव संपन्न झाला. घराघरांत चोर फिरले.

गोमन्तक डिजिटल टीम

Sattari News :

वाळपई, सत्तोरी तालुक्याच्या पारंपरिक शिमगोत्सवाला सुरुवात झाली. सत्तरी तालुक्याच्या अनेक गावांमध्ये होळी साजरी करून इतर विधींनी सुरुवात होते. आज सकाळी काही ठिकाणी चोरोत्सवाला सुरुवात करण्यात आली.

पारंपरिक पद्धतीने काही ठिकाणी घराघरांत चोर फिरण्याची पद्धत आहे. आज सकाळी, सत्तरीच्या ग्रामीण भागात बहुतेक ठिकाणी सकाळच्या वेळी चोरोत्सव संपन्न झाला. घराघरांत चोर फिरले.

त्यावेळी त्यांची ग्रामस्थांनी विधिवत पूजा केली. तसेच झर्मे गावाचा चोरोत्सव रात्री उशिरा संपन्न झाला. कोपार्डे गावात सुध्दा रायच्या मंदिरात होळी घातल्यानंतर चोरोत्सव संपन्न झाला.

सत्तरी तालुक्यात सर्वच गावांमध्ये पारंपरिक शिमगोत्सव साजरा करण्यात येत असतो. या वेळी होळी साजरी करून रंगपंचमी साजरी करणे, घोडेमोडणी, पालखी, कलश उत्सव असे विविधांगी पारंपरिक उत्सव साजरे करण्यात येत असतात. यावेळी लहानापासून ते वृद्धापर्यंतच्या नागरिकांनी होळी उत्सवात सहभाग घेतला होता.

गावागावांत आता ढोल तासांचा आवाज घुमू लागला आहे. आज जग बदलत असलेले तरी आपली परंपरा जतन करण्याचे काम आजची पिढी चांगल्या पद्धतीने करत आहे.

एकूण पाच, सहा, सात दिवस चालणाऱ्या या शिमगोत्सवात होळी, चोरोत्सव, घोडेमोडणी, करवल्या त्यानंतर न्हावण होऊन रंगपंचमीने उत्सवाची सांगता होणार आहे.

करंझोळचा चोरोत्सव

आज मासोर्डे येथे संपन्न झालेल्या चोरोत्सवात श्री शांतादुर्गा रवळनाथ, तसेच श्री सातेरी कुळमाया, कोपार्डे येथील श्री ब्राम्हणी महामाया मंदिर आदी ठिकाणी चोरोत्सव संपन्न झाला. सर्वांनी ढोलताशाच्या जगताच सर्वांचे स्वागत केले. दरम्यान करंझोळ गावाचा चोरोत्सव ३० रोजी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ओळखणंही झालं कठीण! WWE दिग्गज John Cenaचा धक्कादायक लूक; फोटो पाहून चाहतेही अवाक्!

Ardh Kendra Yog 2026: बँक बॅलन्स वाढणार, सगळ्या चिंता मिटणार! 'अर्धकेंद्र योग' बदलणार 5 राशींचे भाग्य; धनाचा होणार वर्षाव

Bicholim Heavy Rain: डिचोलीत पावसाचा पुन्हा तडाखा; दोन ठिकाणी झाडे कोसळली

Indus Waters Treaty Row: "...तर हात कापून टाकू!" सिंधु जल करारावरुन पाकिस्तानी मंत्र्यांचा जळफळाट; दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकड्यांची भारताविरोधात आगपाखड

'एमआरएम' गेमचेंजर की नुसताच प्रयोग?

SCROLL FOR NEXT