Sattari Dainik Gomatnak
गोवा

Sattari News : सत्तरीत तालुक्यात नदी परिसरात जिलेटिनचा धोका वाढला; जलप्रदूषणाची शक्यता

Sattari News : छुप्‍या पद्धतीने मासेमारीही होते, त्यामुळे जलप्रदूषण होते, मुळात पाणी कमी असल्याने मोठे जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्‍यावर संबंधितांनी शासकीय यंत्रणांनी निर्बंध घालावे, अशी मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात येत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Sattari News :

वाळपई, सत्तरीतील अन्‍सोळे येथे झालेला स्‍फोट जिलेटिनचाच असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. परंतु हे जिलेटिन कोठून आणले होते, याचा उलगडा झाला नसून काही ठिकाणी नदीत जिलेटिनद्वारे मासेमारी करण्यात येत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

छुप्‍या पद्धतीने मासेमारीही होते, त्यामुळे जलप्रदूषण होते, मुळात पाणी कमी असल्याने मोठे जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्‍यावर संबंधितांनी शासकीय यंत्रणांनी निर्बंध घालावे, अशी मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात येत आहे.

सत्तरी तालुक्यात सर्रासपणे जिलेटिनचा वापर करून खडी क्रशर व्यवसायात वापर होतो. संशयिताचा डोंगर कापणीचा व्यवसाय आहे. याआधी अन्य लोक सत्तरीत म्हादई नदीच्या पात्रात, वेळुस नदीत मासेमारी करण्याचेही प्रकार समोर आले होते. मासेमारी करणारे लोक काचेच्या बाटलीत जिलेटिन घालून वात पेटवून पाण्यात टाकतात. रात्रीच्या वेळी होतात, या प्रकारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, असे पर्यावरणवाद्याचे मत आहे.

जैवसंपदेवर परिणाम शक्य

जिलेटीनमुळे माशांबरोबरच अन्य जलचरांनाही धोका असतो. जैव संपदेवर विपरीत परिणाम होतो. पाण्यातील विषारी वायूमुळे मनुष्याच्या आरोग्यावर परिणाम होतो. उन्हाळ्यात नदीतील डोहातील पाणी पिण्यासाठी वन्यप्राणी , पाळीव प्राणी देखील येतात. अशांनाही धोका असतो.

विशेषतः खडी क्रशर व्यवसायात काळा दगड फोडण्यासाठी गोव्यात सर्रासपणे जिलेटिनचा वापर करतात. मनुष्य वस्तीत जिलेटिनचे प्रकार आणणे यावर कडक कारवाईची गरज आहे. तरच यावर नियंत्रण येण्यास मदत होईल, असे मत पर्यावरणवादी विठ्ठल शेळके यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zuari River: झुआरी नदीपात्रातील भराव, अतिक्रमणाचा नकाशा द्या; 'NGT'चे जीसीझेडएमएला निर्देश, 2 आठवड्यांची दिली मुदत

सोशल मीडियावर सरकारी नोकरीचे आमिष! गोवा कर्मचारी निवड आयोगाच्या नावानं भरतीची बनावट जाहिरात, सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

Bhadrapada Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमेवर महासंकट! चंद्र-शनीच्या युतीमुळे बनतोय खतरनाक 'विष योग'; 3 राशींचं बिघडणार गणित

Srinivas Naik Firing Case: पर्वरी गोळीबार प्रकरण: थिवी येथे पिस्तूल, जीवंत काडतूस जप्त; संशयितांवरील फास आणखी घट्ट

Viswajit Rane Delhi visit: मंत्री विश्वजीत राणे यांनी घेतली अमित शहांची भेट, दिल्लीत बी. एल. संतोष, भूपेंद्र यादव यांच्याशीही चर्चा

SCROLL FOR NEXT