SATISH SHETGAONKAR  Dainik Gomantak
गोवा

Indian Culture : दुर्गा उत्सवामधून प्रबोधन व्हावे - जि.पं. सदस्य सतीश शेटगावकर

ते दत्त मंदिर येथील नवीन रंगमंच आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्‍घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Indian Culture : मोरजी, भारतीय उत्सव आणि भारताची संस्कृती यातून वेगवेगळे कलाविष्कार संस्कार घडवण्याचे काम अशा उत्सवातून होत असते. दुर्गा उत्सव राष्ट्रीय उत्सव म्हणून गावागावात साजरा केला जातो.

या उत्सवातून भारतीय संस्कृतीलाही चालना मिळावी, तसेच समाजप्रबोधन व्हावे,असे प्रतिपादन मोरजी जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर यांनी केले. ते दत्त मंदिर येथील नवीन रंगमंच आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्‍घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

मोरजी सार्वजनिक श्री दुर्गा देवी उत्सव समिती श्री दत्त मंदिर देवस्थान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शंकर स्वामी सभागृहाचा लोकार्पण सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा उद्‍घाटन सोहळाही याच वेळी आयोजित केला.

यावेळी मोरजी सरपंच मुकेश गडेकर ,स्थानिक पंच रजनी शिरोडकर ,माजी वनाधिकारी अनिल शेटगावकर ,दुर्गा उत्सव समितीचे अध्यक्ष उदय शेटगावकर , मावळते अध्यक्ष रमेश दाभोलकर, संजय दाभोलकर, उद्योजक बाबी बागकर लक्ष्मण

उर्फ दादी शेटगावकर, सुधीर कान्नाईक, प्रकाश शेटगावकर, प्राची भिवशेट, राजेश , प्रेमानंद आसगावकर बबीता साळगावकर , प्रकाश सप्तोजी , रंजेश कासकर, भावेश्री बागकर , स्नेहा तिळोजी, साईशा वाडजी दत्तप्रसाद तिळोजी आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक सतीश च्यारी यांनी केले. तर पाहुण्यांचे नागनाथ केरकर, प्रसाद बागकर, श्रध्दा बागकर , संतोष च्यारी, दत्ताराम बागकर, उदय बागकर, मिलन पेडणेकर, साईल कान्नाईक, मिरा पोके, विजया केरकर, सोनिया दाभोलकर, विनेशा दाभोलकर, जोसना काननाईक, पूजा भोसले, साईली काननाईक, वनिता केरकर महादेव केरकर, गोपाळ सावळ आदींनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.

प्रकाश शेटगांवकर, अनिल शेटगांवकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

सतीश शेटगावकर यांनी पुढे सांगितले, की मोरजी सार्वजनिक दुर्गा उत्सव पूजनातून आणि मंडळींनी लोकापयोगी उपक्रम राबवले आहेत. सभागृहाचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा. जिल्हा पंचायत निधीतून लागेल ते सहकार्य करू.

उद्योजक बाबी बागकर यांनी सांगितले,की दुर्गा उत्सव समितीचे कार्य जवळून पाहण्याचा योग आला. नव्या कलाकारांना व्यासपीठ देण्याबरोबरच वेगवेगळ्या कला या रंगमंचावर सादर व्हाव्यात त्यासाठी वेगळे प्रशिक्षण देण्याचाही मनोदय उत्सव समितीचा असतो,हे कौतुकास्पद आहे.

सुरुवातीला सुरेश केरकर आणि दत्तराज च्यारी यांच्या मार्गदर्शनातून महिलांनी स्वागत गीत सादर केले. सुधीर कान्नाईक यांनी समितीने राबवलेल्या उपक्रमाची माहिती दिली.

मोरजी सार्वजनिक दुर्गा उत्सव समितीचे कार्य वंचित घटकापर्यंत पोहोचावे या दृष्टीने समितीचा प्रयत्न असतो. सफाई कामगारांबरोबरच आरोग्य सेवा देणारे कामगार, डॉक्टर, नर्स,शिवाय वीज कर्मचारी यांचाही यथोचित सन्मान यापूर्वी या समितीने केलेला असून हे कार्य स्तुत्य आहे.

- मुकेश गडेकर, मोरजीचे सरपंच

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

संपादकीय: आमची मते कुठे गेली?

Chandra Gochar 2026: 4 राशींसाठी सुरू होणार 'गोल्डन टाइम'! कर्क राशीत चंद्राच्या प्रवेशाने धनलाभाचे योग, नशीबही देणार साथ

Goa Development: 2014नंतर गोव्याचा 'आश्‍चर्यकारक' विकास; झुआरी पुलाची रचना पाहून शिवराजसिंह चौहान भारावले

Pajifond Cemetery Issue: पाजीफोंड कब्रस्तानचा प्रश्न सोडवू; दामू नाईकांची पाहणी, विजय सरदेसाईंवर टीका

IND vs WI T20I: ODIचा थरार संपताच आता टी-20चा धुमाकूळ! भारत-वेस्ट इंडिजमध्ये 5 सामन्यांची मालिका; जाणून घ्या तारीख, वेळ अन् ठिकाण

SCROLL FOR NEXT