Sati Bhavani's Palkhi at Bhatlem Panaji Dainik Gomantak
गोवा

भाटले-पणजी येथील सटी भवानीची आज पालखी

भाविकांनी दरवर्षीप्रमाणे ठरलेल्या जागी उपस्थित रहावे,असे आवाहन मंदिर समितीने केले

दैनिक गोमन्तक

पणजी: भाटले-पणजी येथील सटी भवानी देवस्थानचा 43 वा वर्धापन दिन व पालखी सोहळा विविध कार्यक्रमानिशी होणार आहे. यानिमित्त देवीचा पालखी सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे होणार आहे,मात्र भाविकांनी मंदिरात येऊन देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. पालखी मिरवणुकीवेळी भाविकांना ओटी भरता येईल. पालखी मिरवणूक सायंकाळी चार वाजता निघणार आहे. भाविकांनी दरवर्षीप्रमाणे ठरलेल्या जागी उपस्थित रहावे,असे आवाहन मंदिर समितीने केले आहे.

गुरूवार दि. 10 रोजी सकाळी सात वाजल्यापासून विविध धार्मिक विधी, दुपारी 12.30 वाजता आरती,महाप्रसाद होईल. सायंकाळी 4 वाजता श्रीची पालखी मिरवणूक होईल. शुक्रवार दि.11 रोजी रात्री 8 वाजता फळांची पावणी होईल.रात्री दहा वाजता सुविसिनींच्या जोडव्याचा कार्यक्रम होईल.शनिवार दि.12 रोजी दुपारी ३वाजता भाटले स्पोर्टस क्लबतर्फे सत्यनारायण पूजा होईल. 7 वाजता भजन,तर 8 वाजता फळांची पावणी होईल.रात्री दहा वाजता अभिनय पणजी प्रस्तुत 2 अंकी नाटक आवयचो पूत,सुनेचेर भूत हे नाटक सादर होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT