Mohan Bhagwat In Goa | Mohan Bhagwat News Dainik Gomantak
गोवा

Mohan Bhagwat In Goa: सरसंघचालकांचे आज गोव्यात आगमन, मुख्य मार्गांवर पोलिसांचा बंदोबस्त

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे आज सोमवारी गोव्यात दाखल होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे आज सोमवारी गोव्यात दाखल होत आहे. दरम्यान, डॉ. मोहन भागवत ज्या रस्त्याने आज येणार आहे त्या रस्त्यावर काल रविवारी पोलिसांनी रंगीत तालीम घेतली. २ ते ७ जानेवारी दरम्यान गोव्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात संघ परिवारातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. भागवत येत आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन २ ते ७ दरम्यान फोंडा तालुक्यातील नागेशी येथे होत असून या निमित्ताने विविध कार्यक्रमांचा आयोजन केल्याची माहिती संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली. नागेशी येथे संघाचे राष्ट्रीय अधिवेशन होत असल्याने नागेश महारुद्र देवस्थानची रंगरंगोटी आयोजनाची सर्व तयारी देखील पूर्ण झाली आहे.

डॉ. मोहन भागवत हे दाबोळी विमानतळावरून वेर्णा, बोरी मार्गे नागेशीला येणार असल्याने या रस्त्यावर काल पोलिसांनी रंगीत तालीम घेतली. अतिमहिनीय व्यक्तींत डॉ. भागवत यांचा समावेश असल्याने त्यांना मुख्यमंत्री किंवा एखाद्या केंद्रीय मंत्र्याला जसा पोलीस बंदोबस्त पुरविला जातो. तसाच बंदोबस्त रंगीत तालमीच्यावेळी तैनात करण्यात आला होता. काही मोक्याच्या ठिकाणी मुख्य रस्त्यावरील वाहतूक सुद्धा रोखून धरण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT