Advalpal Gajanan Palkar Dainik Gomantak
गोवा

Advalpal: अखेर 'त्या' सरपंचांची उचलबांगडी! अडवलपाल पंचायतीचा अविश्वास ठराव मंजूर

Advalpal Sarpanch: अडवलपाल पंचायतीचे सरपंच गजानन पालकर यांची अखेर सरपंचपदावरून उचलबांगडी झाली आहे. त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव ४ विरुद्ध शून्य मतांनी मंजूर झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

Advalpal Sarpanch Gajanan Palkar Removal

डिचोली: अडवलपाल पंचायतीचे सरपंच गजानन पालकर यांची अखेर सरपंचपदावरून उचलबांगडी झाली आहे. त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव ४ विरुद्ध शून्य मतांनी मंजूर झाला.

अडवलपाल पंचायतीच्या पाचपैकी उपसरपंच मिळून ३ पंचसदस्यांनी गेल्या २८ नोव्हेंबर रोजी सरपंच गजानन पालकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. या अविश्वास ठरावावरील चर्चेवेळी अविश्वास ठरावावर स्वाक्षरी नसलेला अन्य एक पंचसदस्यही ठरावाच्या बाजूने राहिला.

अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी आज (मंगळवारी) अडवलपाल पंचायत मंडळाची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीस उपसरपंच विनश्री गावकर यांच्यासह सुबत्ता सामंत, गीतेश गडेकर आणि शेखर परवार हे चार पंचसदस्य उपस्थित होते. तर पदच्युत सरपंच गजानन पालकर यांनी बैठकीकडे पाठ केली होती. अविश्वास ठरावावर चर्चा होऊन हा ठराव ४ विरुद्ध ० मतांनी मंजूर झाला, अशी माहिती मिळाली आहे. निर्वाचन अधिकारी म्हणून गटविकास कार्यालयाचे अधिकारी प्रतापराव राणे यांनी जबाबदारी सांभाळली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT