Sarmanas crematorium Dainik Gomantak
गोवा

लाखो रुपये खर्चून बांधलेल्या सारमानस स्मशानभूमीचे बुधवारी होणार लोकार्पण

ग्रामसमृद्धी योजनेंतर्गत प्रकल्पाची उभारणी, 31 लाख रुपयांचा निधी खर्च

दैनिक गोमन्तक

डिचोली : पिळगाव पंचायत क्षेत्रातील सारमानस भागातील लोकांची गेल्या कैक वर्षांपासूनची स्मशानभूमीची प्रतीक्षा एकदाची संपली आहे. ग्रामीण विकास यंत्रणेच्या ग्रामसमृद्धी योजनेंतर्गत सारमानस येथे सर्व सोयीनीयुक्त अशी स्मशानभूमी बांधण्यात आली आहे.

येत्या बुधवारी 27 एप्रिल रोजी या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. सुमारे 31 लाख रुपये खर्चून हा प्रकल्प उभा करण्यात आला आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्यात या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. मात्र सुरुवातीचे दोन-तीन महिने प्रकल्पाच्या कामाला सुरुवातच झाली नव्हती. त्यामुळे या प्रकल्पाचे भवितव्य अनिश्चित होते. कधी एकदाची स्मशानभूमी पूर्णत्वास येऊन एखाद्याच्या अंतिम संस्कारावेळी होणारी अडचण दूर होणार, त्याकडे सारमानसवासियांचे लक्ष लागले होते.

दरम्यान सारमानस भागातील स्मशानाची जागा ही अत्यंत अडगळीच्या ठिकाणी असल्याने त्याठिकाणी अंत्यविधी करण्याचे टाळून स्थानिक मिळेल, त्याठिकाणी मोकळ्या जागेत अंत्यविधी उरकून घेत असत. ही अडचण लक्षात घेऊन सारमानस भागात कार्यरत असलेल्या सेसा (वेदांता) खाण कंपनीने स्मशानभूमीसाठी नव्याने 500 चौरस मीटर जागा उपलब्ध करून दिली. याच जागेत ग्रामीण विकास यंत्रणेच्या ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत 31 लाख रुपये खर्चून स्मशानभूमी प्रकल्प उभा राहिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity Tariff: घरगुती वीज ग्राहकांना दिलासा! वेळेनुसार दरवाढ तूर्त नाही; मंत्री ढवळीकर यांचा खुलासा

Morjim: सावधान! गोव्यातील 'या' रस्त्यावर गाडी लावल्यास होणार कारवाई; स्थानिकांना पार्किंग सोय करणे बंधनकारक

Chhath Puja History: राम-सीतेची निष्ठा, पांडवांचे यश: 'छठ पूजा' श्रद्धेचा आणि शक्तीचा प्राचीन वारसा

Horoscope: कष्टाचे चीज होईल, कामात थोडा ताण जाणवेल तरीही आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका!

Viral Video: फूड कॉम्बिनेशनचा डोक्याला शॉट लावणारा अजब प्रकार व्हायरल, नेटकरीही चक्रावले; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, 'हे ट्राय करु नका...'

SCROLL FOR NEXT