Saptakoteshwar Temple |Goa  Dainik Gomantak
गोवा

Saptakoteshwar Temple: सप्तकोटीश्वर मंदिराचे लोकार्पण; आनंददायी सोहळा पाहायला भक्तांचा महापूर लोटला

विविध धार्मिक विधींसह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत नार्वे-डिचोली येथील सप्तकोटीश्वर मंदिराचे अभूतपूर्व उत्साहात शनिवारी लोकार्पण करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

Saptakoteshwar Temple: ढोलताशांचा निनाद आणि विविध धार्मिक विधींसह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत नार्वे-डिचोली येथील सप्तकोटीश्वर मंदिराचे अभूतपूर्व उत्साहात शनिवारी लोकार्पण करण्यात आले.

मंदिरासह समोरील पवित्र तळीचेही लोकार्पण करण्यात आले. या आनंददायी सोहळ्याची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी गोव्यासह शेजारच्‍या राज्‍यांतून भक्तांचा महापूर लोटला होता. पुरातत्व खाते आणि देवस्थान समितीच्या सहकार्याने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी अभिषेक करून श्री सप्तकोटीश्वर चरणी आपली सेवा अर्पण केली. यावेळी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट उपस्थित होते.

नंतर गोवा आणि महाराष्ट्रातील विविध किल्ले आणि पवित्र स्थानांवरील जलाने जलाभिषेक सोहळा पार पडला. लोकार्पण सोहळ्यानिमित्त गेल्या गुरुवारपासून विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.

8 कोटी खर्च

1668 साली छत्रपती शिवाजी महाराज यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. पुरातत्व खात्यातर्फे सुमारे 8 कोटी रुपये खर्चून या ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळ असलेल्या मंदिराचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. मात्र मंदिराचे मूळ बांधकाम जशास ठेवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Goa Visit: अमित शहांचे 'मिशन गोवा'! विधानसभा निवडणुकीच्या अंतिम रणनीतीसाठी भाजपची 'मेगा' बैठक

Assembly Election: जनगणना डिसेंबरमध्ये, फेब्रुवारीत निवडणूक! केंद्राच्या आदेशाने गोवा विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा

IND vs PAK: टीम इंडियाकडून लाजीरवाणा पराभव होऊनही मस्ती उतरेना! पाकिस्तानचा कोच म्हणतोय, 'आम्हीच बेस्ट'; आशिया कप जिंकण्याचा दावा Watch Video

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

SCROLL FOR NEXT