Jail Arrest Dainik Gomantak
गोवा

Online Gambling Bust: बंद घरातील ऑनलाईन जुगार अड्डा उद्ध्वस्त! 20 जणांना अटक; 4 लाखांची रोकड जप्त

Goa Crime News: नेसाय गेटजवळ एका बंद घरात सुरू असलेल्या ऑनलाईन जुगाराचा मायणा-कुडतरी पोलिसांनी पर्दाफाश करताना २० जणांच्या मुसक्या आवळल्‍या.

Sameer Panditrao

मडगाव: सां जुझे दी आरियाल येथील नेसाय गेटजवळ एका बंद घरात सुरू असलेल्या ऑनलाईन जुगाराचा मायणा-कुडतरी पोलिसांनी पर्दाफाश करताना २० जणांच्या मुसक्या आवळल्‍या. तसेच ४ लाख ४० हजारांची रोकड जप्त केली. चार टॅब, एक राउटर व एक मॉडेमही पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे.

रत्नाकर केळवेकर, सचिन सिंग, इरफान बिडगी, दिनिज मिरांडा, सिलझोन फर्नांडिस, मोहम्मद हुसेन, डेंझिल डायस, रॉनी मोरेस, हनुमंत लमाणी, प्रसप्पा लमाणी, आशिष इरेकर, अभिषेक चौबे, मोहम्मद सनागर, इस्माईल बेपारी, फिरोझ धारवाडकर, आग्नेल डिसोझा, सिकंदर लिंबुबळे, सरवर बाशा गुट्टाल, श्रवण कुमार व देवेंद्र साबसरी अशी संशयितांची नावे आहेत.

जुगार कायद्याखाली पोलिसांनी संशयितांवर गुन्हा दाखल करून नंतर त्‍यांना अटक केली. मागाहून त्‍यांची जामिनावर सुटका करण्‍यात आली.

पोलिसांनी ४ लाख ४० हजारांची रोकड जप्त केली. चार टॅब, एक राउटर व एक मॉडेमही ताब्‍यात घेतले आहे. पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गौरव नाईक पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: टॅक्सी, लॉजिंग, सीफूड झाले स्वस्त! GST कमी झाल्याने गोव्यात खिशाला परवडणाऱ्या पैशात करता येणार पर्यटन

Narkasur in Goa: संपूर्ण भारतापेक्षा गोव्याची दिवाळी असते खास! राक्षस वधाने होते पहाट, कुठे पाहाल 'नरकासुर दहनाचा' थरार?

Taj Mahal Fire Video: प्रसिद्ध ताजमहालच्या दक्षिणेकडील प्रवेशद्वाराजवळ लागली आग, शॉर्ट सर्किटमुळं घडली घटना; व्हिडिओ आला समोर

NH 66 Closure: 'ट्रायल रन' फेल! सर्व्हिस रोडवरील गर्दीने पर्वरी हँग; चालकांनी व्यक्त केला तीव्र संताप

World Cup 2025: भारतीय महिला संघासमोर 'करो या मरो'ची स्थिती! सेमीफायनलचे दार उघडणार की बंद होणार? 2 पराभवांनंतरही संधी? वाचा संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT