Sao Joao Festival 2024 Old Goa Goa Tourism Instagram
गोवा

Sao Joao Festival: दीड कोटींचा सरकारी सांजाव फ्लॉप; स्थानिक, पर्यटकांनी फिरवली पाठ

Sao Joao Festival: अल्पप्रतिसाद असल्याने सकाळी साडे दहा वाजता होणारे उद्घाटन दुपारी साडे बारा झाले तरी पार नाही पडले.

Pramod Yadav

गोव्यात दरवर्षी मोठ्या उत्साहात सांजाव साजरा केला जातो. गेल्या वर्षापासून ओल्ड गोव्यात सरकारच्या पर्यटन विभागाच्या वतीने सांजाव साजरा केला जात आहे. यावर्षी देखील ओल्ड गोव्यात या उत्सवाचे आयोजन करण्यात आले. पण, सरकारी सांजावकडे स्थानिकांसह पर्यटकांनी पाठ फिरवली आणि उत्सव पूर्णपणे फ्लॉप झाल्याचे दिसून आले.

विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ओल्ड गोव्यातील सांजाव उत्सवासाठी दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, नागरिकांसह पर्यटकांनी उत्सवाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.

पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या हस्ते सकाळी दहा ते साडे दहाच्या सुमारास या उत्सवाचे उद्धाटन होणे अपेक्षित होते. पण, अल्पप्रतिसाद असल्याने दुपारी साडे बारा झाले तरी या उत्सवाचे उद्घाटन पार नाही पडले.

याप्रकरणी स्थानिकांनी सरकारच्या नियोजनावर शंका उपस्थित करत, पर्यटन मंत्र्यांसह स्थानिक आमदारावर टीका केली. सांजाव इव्हेंट नसून गोव्याच्या संस्कृतीचा एक महत्वाचा उत्सव असल्याचे मत त्यांनी मांडले.

ओल्ड गोव्यातील सांजाव उत्सवाच्या निमित्ताने संगीत कार्यक्रमाशिवाय खाद्यपदार्थांचे स्टॉल देखील उभारण्यात आले होते. मात्र, अल्पप्रतिसादामुळे सरकारचा सांजाव फ्लॉप ठरल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

गोव्यात दरवर्षी २४ जून रोजी सांजाव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. राज्यातील शिवोली, डिचोली, पणजीसह दक्षिण गोव्यात देखील सांजावचा उत्साह पाहायला मिळतो. पण, गेल्या वर्षीपासून ओल्ड गोव्यात सरकारच्या वतीने सांजाव साजरा केला जातो मात्र, यावर्षी अल्पप्रतिसादामुळे उत्सव फ्लॉप झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT