पाणी टच्चाई
पाणी टच्चाई Dainik Gomantak
गोवा

Goa: काले पंचायत क्षेत्रात, बारमाही टँकरने पाणीपुरवठा

दैनिक गोमन्तक

Kalay: ‘हर घर नल’ या योजनेत गोवा राज्य देशात प्रथम क्रमांकावर असल्याचा देशात गवगवा केला जात आहे, मात्र अजूनही गोव्याच्या कानाकोपऱ्यात नळ नाही, अन् पाणीही नसल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. चुकीचा सर्व्हे केंद्राला पाठविण्यात आल्याचे स्पष्टपणे थेट पंतप्रधान कार्यालयात तक्रारी नोंदवू लागले आहे. याचा परिणाम काय, तो होणारच. पण किमान जनतेला नळ तरी देण्याची मागणी होऊ लागली आहे.

* आपबिती अशी

सावर्डे मतदारसंघातील काले पंचायत क्षेत्रातील पोकरमळ भागात सुमारे पंच्यात्तर पेक्षा अधिक घरे आहे. या गावात आजही भर पाऊस, उन्हात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. प्रत्येक नागरिक आपल्या घरा समोर मिळेल, ती भांडी कुंडी दारात रचून ठेवतात.

टँकर (Tanker)) आल्यानंतर पाणी उपलब्ध होत असते. ही परिस्थिती केवळ एकाच ग्रामीण भागातील आहे, अस नाही, सर्वच ठिकाणी कसून चौकशी केली तर कित्येक घरांना नळ नसल्याचे उघड होणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रीच सावर्डे मतदारसंघांचे आमदार होते. तरीही पाणी समस्या मिटविता आली नाही.

काले (Kalay) पंचायत भागातील कारेमळ, वळडव, बॉन्डेल, या भागातही बारामही टँकरद्वारे दोन दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे.

पाणी येण्याच्या वेळी घरात कोणी असला तर पाणी नसल्यास दिवस भर पाणी पाणी करावे लागत आहे. ही परिस्थिती घरात नळ (Faucets) असल्याची अन् नसलेल्यांनी काय होत असेल? भांडोळं-किर्लपाल या गावातील तीच परिस्थिती आहे.

शैलेश नाईक, सरपंच काले-

काले भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा होतो, हे बरोबर आहे. पण त्याच बरोबर ‘जायका’ची जलवाहिनी टाकण्यात आली आहे, त्याची जोडणी काम शिल्लक आहे, त्याची पूर्तता करण्यासाठी आमदार गणेश गावकर यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lairai Jatra: लईराई देवीचा जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा; भाविकांचा लोटला महापूर

Netravali: कदंबच्या 'त्या' कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करणार : वनमंत्री राणे

Yellow Alert In Goa: गोव्यात दोन दिवस यलो अलर्ट, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Mukesh Ambani: मुकेश अंबानी लवकरच करणार 150 अब्ज डॉलर्सच्या मार्केटमध्ये एन्ट्री? ‘या’ क्षेत्रात आजमावणार हात

गोव्यात लवकरच AI द्वारे होणार फुफ्फुसाच्या कर्करोगाची तपासणी, आरोग्य मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT