Goa Road Dainik Gomantak
गोवा

Panjim Smart City: सांतिनेज ताडमाड ते ‘एसटीपी’पर्यंतच्या रस्त्याचे काम पंधरा दिवसांत करणार

Goa Government: पणजी शहरातील आणखी सहा ठिकाणी रस्त्यांच्या डागडुजीसंदर्भात लक्ष वेधण्यात आले असून त्यासंदर्भातची माहिती मंगळवारी (२७ ऑगस्ट) दिली जाणार आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांपैकी सांतिनेज येथील ताडमाड ते मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) पर्यंतचा तात्पुरता रस्ता ‘ड्रायलिन’ काँक्रिटने १५ दिवसांत तयार केला जाईल. पणजी शहरातील आणखी सहा ठिकाणी रस्त्यांच्या डागडुजीसंदर्भात लक्ष वेधण्यात आले असून त्यासंदर्भातची माहिती मंगळवारी (२७ ऑगस्ट) दिली जाणार आहे त्यामुळे स्वेच्छा याचिकेवरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मंगळवारपर्यंत तहकूब केली.

सांतिनेज येथील काकुलो मॉल ते एसटीपी पर्यंतच्या १८० मीटर अंतरापैकी काकुलो मॉल ते ताडमाडपर्यंतचा रस्ता पूर्ण झाला आहे मात्र रस्त्याच्या बाजूने असलेल्या पदपथाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही.

ताडमाड ते एसटीपीपर्यंत सुमारे ५० मीटर अंतराचा रस्ता खूपच खडबडीत झाला असल्याने वाहतूक करताना मुश्किलीचे झाले आहे, अशी माहिती ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी दिली. यावर उच्च न्यायालयाने हा रस्ता कधी व किती वेळेत पूर्ण होईल असा प्रश्‍न केला.

त्याला उत्तर देताना पांगम यांनी सांगितले की ताडमाड ते एसटीपीपर्यंतच्या मलनिस्सारण पाईपचे काम अजून पूर्ण झालेले नाही मात्र वाहतुकीस मुश्कील बनलेल्या रस्त्याचे काम तातडीने हाती घेतले जाईल. ‘ड्रायलिन’ काँक्रीटचा वापर करून हा रस्त्याचे समतल केले जाईल.

उर्वरित सहा ठिकाणच्या कामाबाबत स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यावर तोडग्याबाबत चर्चा करून पुढील सुनावणीवेळी माहिती देण्याचे आश्‍वासन सरकारतर्फे देण्यात आले. याचिकादाराच्या वकिलांनी स्मार्ट सिटी कामे वेळेत पूर्ण करण्यास सरकार अपयशी ठरल्याने लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

कामांचा सविस्तर तक्ता

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या कामांचा सविस्तर तक्ता (बारचार्ट) पुढील सुनावणीवेळी उच्च न्यायालयाला सादर केला जाईल. यामध्ये कंत्राटदाराला काम पूर्ण करण्यास दिलेली मुदत, त्याला कोणत्या भागातील काम देण्यात आले आहे, कामासाठी दिलेली मुदत, बाकी राहिलेले काम, कामाला उशीर झाल्याने त्याचे कारण तसेच मुदतवाढीसाठीचे कारण याचा त्यामध्ये समावेश असेल, अशी माहिती ॲडव्होकेट जनरल पांगम यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांची कारवाई! सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Cash For Job Scam: गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या विषया आणि सोनियाला जामीन मंजूर; मडगाव कोर्टाचा निर्णय

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

SCROLL FOR NEXT