Santa Cruz BJP Office Dainik Gomantak
गोवा

Santa Cruz BJP Office: बाबूश-रुडॉल्फमध्ये शब्दयुद्ध! सांताक्रुझमधील नवे कार्यालयावरून आरोप-प्रत्यारोप सुरू

Rudolf Fernandes: सांताक्रुझमध्ये नव्या कार्यालयासाठी जागेची पाहणी करतानाचा बाबूश मोन्सेरात यांचा व्हिडिओ व्हायरल झाला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: सांताक्रुझ मतदारसंघात नवे कार्यालय सुरू करण्याच्या हालचालींवरून आमदार रुडॉल्फ फर्नांडिस आणि मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्यात शाब्दिक संघर्ष रंगला आहे. एकाच मतदारसंघात एकाच पक्षाची दोन कार्यालये असू नयेत, अशी भूमिका रुडॉल्फ यांनी मांडत या निर्णयावर टीका केली,

तर बाबूश यांनी संबंधित कार्यालय हे आपले खासगी कार्यालय असल्याचे स्पष्ट करत वादावर पांघरूण घालण्‍याचा प्रयत्‍न केला.सांताक्रुझमध्ये नव्या कार्यालयासाठी जागेची पाहणी करतानाचा बाबूश मोन्सेरात यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर त्यांनी सांताक्रुझ मतदारसंघात भाजपचाच उमेदवार विजयी होईल आणि उमेदवारीबाबत अंतिम निर्णय पक्ष घेईल, असे विधान केले. या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदाराला विश्वासात न घेता कार्यालय सुरू करण्याचा

निर्णय घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे. रुडॉल्फ फर्नांडिस यांनी सांगितले, कोणी कार्यालय सुरू करावे यावर माझा आक्षेप नाही. मात्र, एकाच मतदारसंघात एकाच पक्षाची दोन कार्यालये असणे योग्य नाही. गेल्या चार वर्षांत सांताक्रुझमध्ये भाजप मजबूत करण्यात यश आल्याचा दावा करत जिल्हा पंचायत निवडणुकीतील चिंबल, मेरशी आणि सांताक्रुझ येथील भाजपच्या मताधिक्‍क्याचा दाखला दिला. मतदारसंघातील घडामोडींविषयी पक्षाचे कार्यकर्तेही प्रश्न विचारत असल्याचे त्यांनी सांगितले.

ते माझे खासगी कार्यालय : बाबूश मोन्‍सेरात

बाबूश यांनी हा वाद अनावश्यक असल्याचे सांगितले. ‘हे माझे खासगी कार्यालय असून, पूर्वीचेच कार्यालय पुन्हा सुरू केले आहे. मी कोणाच्याही विकासकामात अडथळा आणत नाही. माझ्या मतदारसंघात कोणी दहा कार्यालये उघडली तरी मला हरकत नाही’ असे ते म्हणाले. त्यामुळे सांताक्रुझमधील या कार्यालयाच्या मुद्यावरून भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा उफळाले आहेत.

भाजपच्या नेतृत्वावर विश्वास : रुडॉल्‍फ

लोकांची कामे करण्याची आठवण बाबूश यांना आता का झाली? असा सवाल करत रुडॉल्फ यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सहकार्यामुळे मतदारसंघात विकासकामे गतीने झाली असल्याचे सांगितले. काहीजण आपल्या विकासकामांत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही रुडॉल्फ यांनी केला. मात्र, भाजपच्या नेतृत्वावर आणि मुख्यमंत्र्यांवर पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: काब्रालचे भाजपला नथीतून बाण!

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत मोठा बदल! रोहित शर्मा बाहेर, यशस्वी जयस्वालची एन्ट्री; पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing-11

Goa FDA: तीन महिन्यांत 20.43 लाखांचा दंड; 'एफडीए'ची धडक कारवाई, 2,528 अन्न आस्थापनांची तपासणी

Goa Forward Panel: दामोदर कॉलेज विद्यार्थी मंडळ निवडणुकीत 'गोवा फॉरवर्ड'चा झेंडा; चारही प्रमुख जागा पॅनलच्या ताब्यात

VIDEO: देवीची मूर्ती आणताना काळाचा घाला! दुर्गोत्सवाच्या तयारीला गालबोट, भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू; 21 जखमी

SCROLL FOR NEXT